घरCORONA UPDATECoronaVirus: धक्कादायक! दिल्लीत कोरोनाचे ७०० रुग्ण!

CoronaVirus: धक्कादायक! दिल्लीत कोरोनाचे ७०० रुग्ण!

Subscribe

दिल्लीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना व्हायरस संशयित आणि बाधितांसह दिल्लीच्या विविध रुग्णालयात ७०० रुग्ण दाखल आहेत, असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले आहे. सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत बुधवारी सायंकाळपर्यंत कोरोना व्हायरस लागण झालेले १५२ रुग्ण होते. यापैकी ५३ जण ही मरकज मधील रुग्ण आहे. दिल्लीमध्ये काल ३२ कोरोनाची बाधितांची संख्या वाढली. ज्यामध्ये निजामुद्दीन येथील कार्यक्रमात २९ लोक सहभागी झाले होती. सध्या दिल्लीत सुमारे ७०० कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्ण आहे. तसंच आज बऱ्याचे लोकांचे अहवाल येतील.

- Advertisement -

इंडिया कोविड-१९ ट्रॅकरनुसार, दिल्ली आतापर्यंत कोणताही नवा रुग्ण आढळले नाही. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या १५२ आहे. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण रिकव्हर झाले आहेत. देशात आतापर्यंत ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजार ९४ इतकी झाली आहे. बुधवारी दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथून २ हजार ३६१ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ६१७ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उर्वरित लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी १ हजार १२५ कोटींची केली मदत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -