घरअर्थजगतनवं तंत्रज्ञान! जलद गाड्यांच्या वेगावर धावते ही टर्बाइन, 60 मिनिटांत 1kW वीज...

नवं तंत्रज्ञान! जलद गाड्यांच्या वेगावर धावते ही टर्बाइन, 60 मिनिटांत 1kW वीज तयार; आनंद महिंद्रांकडून कौतुक

Subscribe

इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यातून अक्षय ऊर्जा स्त्रोत प्राप्त केला जात आहे. त्याची संकल्पना ट्रॅफिकमधून धावणाऱ्या वाहनांवर आधारित आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे, मग तुम्हीच त्याचा हा व्हिडीओ पाहू शकता.

नवी दिल्ली : इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने एक नवीन आणि अनोखा प्रयोग केलाय, ज्याद्वारे अक्षय ऊर्जा निर्माण करता येणे शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान पवनचक्क्यासारखे काम करते. पण त्याची संकल्पना वेगळी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, वेगाने धावणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणारा वारा टर्बाइनला चालवतो आणि त्यातून वीज निर्माण करतो. या नवीन तंत्रज्ञानावर आधारित टर्बाइनचा शोध तुर्कीच्या Devici टेक या कंपनीने लावला आहे. सध्या त्याची चाचणी तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये सुरू आहे. ही टर्बाइन 24 तासात 1 किलोवॅट वीज निर्माण करण्यास सक्षम आहे.

इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यातून अक्षय ऊर्जा स्त्रोत प्राप्त केला जात आहे. त्याची संकल्पना ट्रॅफिकमधून धावणाऱ्या वाहनांवर आधारित आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे, मग तुम्हीच त्याचा हा व्हिडीओ पाहू शकता.

- Advertisement -

तुम्हाला अजूनही समजत नसेल, तर आता आम्ही तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगतो. कधी तरी एखादी वेगवान कार तुमच्या बाजूने गेली आणि तुम्हाला वाऱ्याचा जोरदार झोत जाणवला? होय, हे तंत्र असेच कार्य करते. जोरदार वारा ऊर्जा निर्माण करतो. वेगवान वाहनांमुळे वारा टर्बाइन चालवतो आणि ऊर्जा निर्माण करतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 1 तासात ही टर्बाइन 1 किलोवॅट ऊर्जा निर्माण करते.


विशेष म्हणजे महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केल्यावर ही बातमी चर्चेत आली. ते लिहितात की, इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर करून भारत पवन ऊर्जेमध्ये जागतिक शक्ती बनू शकतो, कारण भारतातील वाहतूक लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि राज्यमंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आणि विचारले की, आम्ही त्यांचा वापर आमच्या महामार्गांवर करू शकतो का? त्यानंतर हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचाः रेनॉल्टकडून दुर्गम खेड्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने देशभरात 300 बुकिंग केंद्रांची स्थापना, नेमकी योजना काय?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -