घरदेश-विदेशभारतात कोरोनाचा कहर; न्यूझीलंडने भारतीयांच्या प्रवेशावर आणली बंदी

भारतात कोरोनाचा कहर; न्यूझीलंडने भारतीयांच्या प्रवेशावर आणली बंदी

Subscribe

देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने पुन्हा एकदा अनेक देशांकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. न्यूझीलंडनच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (Prime Minister Jacinda Ardern) यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ११ एप्रिलपासून साधारण दोन आठवड्यांसाठी भारतातून येणाऱ्या सर्व यात्रेकरूंच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणली आहे, यासंदर्भातील घोषणा न्यूझीलंडनच्या पंतप्रधानांनी गुरूवारी केली. भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे भारतीय नागरिकांना न्यूझीलंडचे नागरिकत्व देण्यात आलेल्या भारतीयांना देखील प्रवेश करण्यास ही बंदी घातली आहे.

न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांच्या प्रवेशावर आणलेली ही बंदी ११ एप्रिल रविवारपासून सुरू करण्यात येणार असून ती २८ एप्रिलपर्यंत असणार आहे, असे न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितले. यासह Covid- 19 पासून सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या इतर देशांमध्ये होत असलेल्या कोरोनाचा धोका यावर देखील सरकार विचारविनिमय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या २३ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या २३ जणांपैकी १७ संक्रमित झालेल्या व्यक्ती भारतातून आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या भारतीय यात्रेकरूंच्या प्रवेशावर ही बंदी लावण्यात आली आहे. तर ही कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहावा, याकरता बाहेरील प्रवाशांच्या प्रवेशावर करण्यात आलेली ही बंदी तात्पुरती व्यवस्था असल्याचे जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

जेसिंडा अर्डर्न यांनी पुढे असेही सांगितले की, काही देशांनी यात्रेकरूंच्या प्रवेशावर यापूर्वी देखील बंदी घातली होती. परंतु कधीही न्यूझीलंडच्या नागरिकांसह स्थानिकांच्या प्रवासावर बंदी घातलण्यात आली नव्हती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, मला माझ्या जबाबदारीची देखील जाणीव आहे. यासह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे होणाऱ्या कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्याच्या प्रयत्नांची जबाबदारी देखील माझ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जेव्हा न्यूझीलंड देशात कोरोना संसर्गाने १ लाखाहून अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तेव्हा हा निर्णय न्यूझीलंडच्या सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. कोरोना व्हायरसने सर्वाधिक बाधित झालेल्या देशांपैकी भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. भारतात दरोरोज सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहे. मृत्यूच्या बाबतीत भारत नंतर अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -