घरताज्या घडामोडीदेशात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय का? १३ पैकी १२...

देशात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय का? १३ पैकी १२ राज्यांनी सांगितलं ‘नाही’

Subscribe

काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने देशात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही असे सांगितले होते त्यावरून देशभरात खळबळ उडाली होती. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोनामृतांचा डेटा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. या डेटानुसार १३ राज्यांपैकी १२ राज्यांनी ऑक्सिजन अभावी एकाही कोरोनारुग्णाचा मृत्यू झालेला नाही असे उत्तर दिले आहे.

तर पंजाबमध्ये चार मृत्यू हे संशयित मृत्यू असल्याचे डेटामध्ये म्हटले आहे. तर इतर १२ राज्यांनी ऑक्सिजन न मिळाल्याने एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही असा डाटाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सोपवला आहे. यात ओडीशा, अरुणाचल प्रदेश,उत्तराखंड, नागालँड, आसाम, लडाख, जम्मू आणि कश्मीर, सिक्कीम, त्रिपुरा, झारखंड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, यांचा समावेश आहे.

- Advertisement -

याआधीही केंद्र सरकारने संसदेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या कोरोनामृत्यूची माहिती सार्वजनिक केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑ्क्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण दगावले होते. पण मंगळवारी ऑक्सिजनच्या अभावामुळे झालेल्या मृत्यूवर काँग्रेसचे खासदार केसी वेणूगोपाल यांनी विचारलेल्या लिखित प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले की आरोग्य हा राज्याचा विषय़ आहे.

यामुळे मृत्यू अहवालासंदर्भातातील विस्तृत माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आरोग्य मंत्रालयाला देत असते. याच माहितीच्या आधारावर देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झालेला नाही. असे स्पष्ट होते. आरोग्य राज्यमंत्र्याच्या या उत्तरावरून मोठा वादही निर्माण झाला होता. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत्यूची नोंद करा, आकडे लपवू नका असे राज्यांना सांगितले होते. पण उलट भारत सरकारवरच मृत्यूचा आकडा लपवल्याचा आरोप होत असून तो साफ खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -