घरCORONA UPDATECorona: आरोग्य मंत्रालयाने लॉकडाऊनच्या एक महिन्यानंतर दिली 'ही' आनंदाची बातमी

Corona: आरोग्य मंत्रालयाने लॉकडाऊनच्या एक महिन्यानंतर दिली ‘ही’ आनंदाची बातमी

Subscribe

देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

२४ मार्च २०२० पासून देशातील लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली होती. आज २३ एप्रिल २०२० रोजी बरोबर एक महिना देशाला लॉकडाऊन पाळून होत आहे. त्या अनुषंगाने आजची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांनी नागरिकांना दिलासादायक माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी, देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसल्याचे यावेळी सांगितले. तसेच गेल्या २८ दिवसांत तब्बल १२ जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला असून गेल्या आठवड्यात हा आकडा ४ होता, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सतत येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ या माहितीमुळे चिंतेत असलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला.

- Advertisement -

काय दिली माहिती 

तसेच गेल्या २४ तासांत देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १४०९ ने वाढ झाली असून ३८८ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठवले असल्याचेही यावेळी आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. शिवाय आतापर्यंत १९ टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत, असेही ते म्हणाले. सध्या २१ हजार ३९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६८१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात १६ हजार ४५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून ४२५७ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात ५ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या

लॉकडाऊन काळातील महिनाभरात देशात जवळपास ५ लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात असून आतापर्यंत केलेल्या ५ लाख चाचण्यांमध्ये जवळपास २१ हजार लोकं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यादरम्यान कोरोना विषाणूचा ट्रान्समिशन आणि डबलिंग रेट कमी करण्यात शासनाल यश आल्याची माहिती यावेळी आरोग्य मंत्रालयाने दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

अमेरिकेने हात झटकल्यानंतर चीनची WHO ला ३ कोटी डॉलर्सची मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -