घरताज्या घडामोडीकोरोनाला रोखण्यासाठी विलगीकरणचे प्रमाण वाढवणे आवश्यक; IIT मुंबईच्या समितीचा अहवाल

कोरोनाला रोखण्यासाठी विलगीकरणचे प्रमाण वाढवणे आवश्यक; IIT मुंबईच्या समितीचा अहवाल

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण शोधणे, विलगीकरणचे प्रमाण वाढवणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण शोधणे, विलगीकरणचे प्रमाण वाढवणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कारण लॉकडाऊन असल्याने कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित ठेवणे शक्य असले तरी लॉकडाउन उठवल्यावर कोरोनाचा विस्फोट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

आयआयटी मुंबई आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी गांधीनगर, आयसीएमआर आणि विश्व भारती विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘ससंर्गजन्य आजाराची बहुद्देशीय चिकित्सा’ करणारा अहवाल तयार केला आहे. या अहवालात ही निरिक्षण नोंदविण्यात आली आहे. सुमारे ३६ जणांच्या चमूने विविध स्तरावर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समस्येवर अभ्यास करण्यासाठी ‘सिस्टीम डायनॅमिक मॉडेल’, ‘सॅटस्टिकल मॉडेल’ आणि ‘X-SEAIPR मॉडेल’ या तीन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. यात विविध कालावधीतील विविध परिस्थितीचा विचार करून रुग्ण संख्येचा गणितीय अभ्यास करण्यात आला. यात पहिल्या दोन पद्धतीत लॉकडाउन उठवल्यावर रुग्णसंख्या नियंत्रणाबाहेर जाईल, असे सूचित करण्यात आले आहे. तर तिसऱ्या पद्धतीमध्ये लॉकडाउन उठले तरी रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण एक ठराविक वेगाने वाढेल असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. जर पूर्ण देान महिने लॉकडाउन सुरू राहिले तर देशाला सुमारे १ लाख ६५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागेल. तर तीन आठवड्यांच्या लॉकडाउनमध्ये मजुरांचा सुमारे ५८ हजार कोटी इतका रोजगार कमी झाला आहे.

भारतीय मॉडेल तयार

देशात कोव्हिड-१९चा सामना करण्यासाठी विविध गट आपल्या स्तरावरून मदत करत आहेत. यात सुमारे ४०० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिस्पॉन्स टू कोव्हिड-१९’ या टीमनेही महामारीचा सामना करण्यासाठी भारतीय मॉडेल तयार केले आहे. त्यांनीही लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धारावीत कोरोनाचे २५ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर; एकाचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -