घरदेश-विदेश...काही सापडणारही नाही, कथित सीबीआय छाप्याच्या पार्श्वभूमीवर सिसोदियांचे ट्वीट

…काही सापडणारही नाही, कथित सीबीआय छाप्याच्या पार्श्वभूमीवर सिसोदियांचे ट्वीट

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर सीबीआयने आज, शनिवारी पुन्हा छापा टाकला. सीबीआयचे पथक दाखल कार्यालयात दाखल झाले तेव्हा, सिसोदिया तिथे नव्हते, असे सांगण्यात येते. माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही किंवा सापडणार देखील नाही, असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले आहे.

- Advertisement -

तथापि, सीबीआयशी संबंधित सूत्रांनी मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर छापा टाकल्याचे वृत्त फेटाळले आहे. सीबीआयच्या कोणत्याही टीमने मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर छापा टाकलेला नाही. सीबीआयचे एक पथक राज्य उत्पादन शुल्कप्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे गोळा करण्यासाठी शनिवारी सिसोदिया यांच्या कार्यालयात गेले होते, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

- Advertisement -

यासंदर्भात खुद्द मनीष सिसोदिया यांनी ट्वीट केले आहे. आज पुन्हा सीबीआयचे पथक माझ्या कार्यालयात पोहोचले आहे, त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या ऑफिसवर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही चौकशी केली. माझ्याविरोधात काहीही सापडले नाही आणि सापडणार देखील नाही; कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही. दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी मनापासून काम केले, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्येही सीबीआयने मनीष सोसोदिया यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्याची माहिती देखील मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरून दिली होती. सीबीआय आली आहे. त्यांचं स्वागत आहे. आम्ही पूर्णपणे प्रामाणिक आहोत. लाखो लहान मुलांचे भविष्य घडवत आहोत. पण, आपल्या देशात जे चांगले काम करतात त्यांना अशा पद्धतीने त्रास दिला जातो. म्हणूनच आपला देश अद्यापही एक नंबर झालेला नाही, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -