घरदेश-विदेशईदच्या निमित्ताने ममता बॅनर्जी म्हणतात, 'मी जीव द्यायला तयार, पण...'

ईदच्या निमित्ताने ममता बॅनर्जी म्हणतात, ‘मी जीव द्यायला तयार, पण…’

Subscribe

नवी दिल्ली : कोलकाता येथील रेड रोडवर ईदच्या नमाजासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) नाव न घेता निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी जीव देईन पण देशाचे तुकडे होऊ देणार नाही.

ईदच्या नमाजासाठी जमलेल्या लोकांना संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आम्हाला बंगालमध्ये दंगली नको शांतता हवी आहे. आम्हाला देशाचे तुकडे होऊ द्यायचे नाही आहेत, पण ज्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, त्यांना मी ईदच्या निमित्ताने वचन देऊ इच्छिते की, मी जीव द्यायला तयार आहे, पण देशाचे तुकडे होऊ देणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 updates : गेल्या 24 तासांत देशामध्ये 12 हजार 193 नव्या रुग्णांचे निदान

लोकांना आवाहन करताना ममता म्हणाल्या की, एका ‘देशद्रोही पक्ष’ आहे ज्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे शांतता राखा आणि कोणाचेही ऐकू नका. देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मला तपास यंत्रणांशीही लढायचे आहे, माझ्यात हिंमत आहे पण मी झुकायला तयार नाही आहे.

- Advertisement -

काही लोक मुस्लीम व्होट बँकेत फूट पाडतात
यावेळी ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणावेळी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, ‘काही लोक भाजपकडून पैसे घेतात आणि निवडणुकीच्या वेळी मुस्लीम व्होट बँकेत फूट पाडतील. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, त्यांच्यात मुस्लिम व्होट बँकेत फूट पाडण्याची हिंमत नाही. माझे तुम्हाला वचन आहे की, पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, तेव्हा बघू कोण निवडून येणार आहे आणि कोण नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत लोकशाही गेली तर सर्व काही संपेल. सध्याच्या काळात संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे. केंद्राने एनआरसी आणली असली तरी मी त्यांना सांगू इच्छिते की मी त्यांना हे करू देणार नाही.

हेही वाचा – खालिस्तान्यांविरोधात ऑस्ट्रेलियाची झीरो टाॅलरन्स नीती; भारताला आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -