घरदेश-विदेश‘अग्निपथ’विरोध कायम उत्तर प्रदेश, बिहारनंतर पंजाबमध्येही तोडफोड

‘अग्निपथ’विरोध कायम उत्तर प्रदेश, बिहारनंतर पंजाबमध्येही तोडफोड

Subscribe

सैन्यदलातील भरतीसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ‘अग्निपथ’ योजनेस विरोधाची धग अद्यापही कायम आहे. या योजनेविरोधात शनिवारी बिहार बंदची हाक देण्यात आलेली असतानाच पंजाबमध्ये तरुणांनी रेल्वे स्थानकाची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. काही आंदोलक तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत लुधियाना रेल्वे स्थानकावर तोडफोड केली, तर अग्निपथ योजनेला विरोध दर्शविण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही ठिकठिकाणी तरुणांनी निदर्शने केली.

अग्निपथ योजनेविरोधात शनिवारी सलग चौथ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह पंजाबमध्येही तरुणांनी रस्त्यावर उतरत या योजनेला अद्यापही विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. बिहारमध्ये आतापर्यंत २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजनेविरोधात हिंसक घटना घडल्या आहेत, तर शनिवारी पुकारण्यात आलेल्या बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असून याचा सर्वाधिक फटका भारतीय रेल्वेला बसला आहे. आतापर्यंत ३४० गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचे ४० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

अग्निवीरांसाठी १० टक्के जागा रिक्त
देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अग्निवीरांना दोन दलांत भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्षांची सूट दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -