घरदेश-विदेशअफगाणिस्तानवर तालिबानच्या सत्तेनंतर महिला पत्रकारांवर उपासमारीची वेळ

अफगाणिस्तानवर तालिबानच्या सत्तेनंतर महिला पत्रकारांवर उपासमारीची वेळ

Subscribe

अफगाणिस्तावर तालिबानने सत्ता स्थापन केल्यापासून अफगाण नागरिकांचा वनवास सुरु झाला आहे. तालिबान सैन्याच्या इशाऱ्यावर आता अफगान नागरिकांना नाचावे लागतेय. त्यामुळे जिवन असूनही तो एका कैद्याप्रमाणे जगावे लागतेय. अशातच महिलांच्या अधिकार स्वातंत्र्यावर तालिबनने पूर्णपणे गदा आणली आहे. अलीकडील अभ्यासानुसार, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून ६४०० हून अधिक पत्रकारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. रिपोर्ट्स विदाऊट वॉर्डर्स (RSF) आणि अफगाण इंडिपेंडेंट जनर्लिस्ट्स असोसिएशन (AIJA) या ना-नफा संस्थांनी केलेल्या अभ्यासात तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाण मीडियामध्ये मोठा बदल झाल्याचे सांगितले आहे.

अफगाणिस्तानमधील आतापर्यंत २३१ मीडिया हाऊस बंद करण्यात आली आहेत. या अभ्यासाच्या आधारे, प्रत्येक १० पैकी ४ माध्यम संस्था गायब झाल्या आहेत. त्यामुळे ६० टक्के पत्रकार आता अफगाणिस्तानात काम करू शकत नाहीत.

- Advertisement -

४३  टक्के मीडिया संस्था गायब

अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात वाईट परिणाम महिला पत्रकारांवर झाला आहे. तालिबानच्या काळात जवळपास ८० टक्के महिला पत्रकारांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आरएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानमध्ये ५४३ मीडिया आउटलेट होते, त्यापैकी केवळ ३१२ मीडिया आउटलेट नोव्हेंबरच्या अखेरीस कार्यरत आहेत. म्हणजे अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत ४३ टक्के मीडिया संस्था अफगाणिस्तानातून गायब झाल्या आहेत.

बहुतेक माध्यम संस्था गायब

अभ्यासात पुढे नमूद करण्यात आले आहे की, चार महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानच्या सर्व क्षेत्रांमध्ये किमान १० खाजगी मीडिया संस्था होत्या, परंतु आज एकही माध्यम संस्था नाहीत. पर्वानच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात पूर्वी १० माध्यम संस्था होत्या, पण आज तिथे फक्त तीनच माध्यम संस्था कार्यरत आहेत. आरएसएफने सांगितले की, हेरात हे पश्चिम शहर आणि आसपासचा प्रदेश हे देशातील तिसरे सर्वात मोठे मीडिया क्षेत्र आहे, आज ५१ पैकी फक्त १८ मीडिया संस्था कार्यरत आहेत, त्याच वेळी, मध्य काबूल प्रदेशात देशातील सर्वात जास्त माध्यम संस्था होत्या, परंतु आजही, प्रत्येक दोन माध्यम संस्थांपैकी एक गायब आहे. १५ ऑगस्टपूर्वी, १४८ माध्यम संस्थांपैकी आज केवळ ७२ कार्यरत आहेत.

- Advertisement -

तालिबानचे वाढते अत्याचार

तालिबानने ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत महिलांचे हक्क, मीडिया स्वातंत्र्य आणि माजी सरकारमध्ये काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना माफी देण्याचे आश्वासन दिले. मात्र इतरांना देखील तालिबानकडून सूडाचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून पत्रकारांवर अत्याचार वाढत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्याचबरोबर तालिबानच्या अधिकाराविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना तालिबानकडून त्रास दिला जात आहे.


IT Raid : कानपूरमधील २ उद्योगपतींवर आयटीची छापेमारी; ६० कोटी जप्त, मशीनने मोजले जातायत पैसे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -