घरदेश-विदेशअमित शहा यांना हिटलर होण्यापासून वाचवा - ओवैसी

अमित शहा यांना हिटलर होण्यापासून वाचवा – ओवैसी

Subscribe

केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्तीचा विधेयकाचा प्रस्ताव आज लोकसभेत मांडला. हा विधेयक मांडल्यानंतर विरोधकांनी या प्रस्तावाच्या विरोधात आवाज उठवला. या विधेयकावर चर्चा करत असताना काँग्रेस आणि इतर विरोधांकडून प्रचंड प्रतिकार करण्यात आला. दरम्यान, या विधेयकाच्या प्रस्तावावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मत मांडण्याची संधी दिली गेली तेव्हा त्यांनी हे विधेयक मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याची टीका केली. याशिवाय ‘हे विधेयक जर भारतात लागू झाले तर अमित शहा भारताचे हिटलर ठरतील. त्यामुळे त्यांना हिटलर होण्यापासून वाचवा’, असे ओवेसी म्हणाले.


हेही वाचा – अखेर एकनाथ खडसेंची हाक दिल्लीने ऐकली; खडसेंना न्याय मिळणार?

- Advertisement -

ओवैसी यांचे वक्तव्य संसदीय कामकाजातून काढूण घेणार – लोकसभेचे अध्यक्ष

‘धर्मनिरपेक्ष हा आपल्या देशाचा मूळ गाभा आहे. नागरिकत्व दुरुस्त विधेयक मुलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन करणारे आहे. या विधेयकामुळे भारताचे इस्त्राईल होईल. गृहमंत्री अमित शहा यांची तुलना हिटलरशी केली जाईल. त्यामुळे अमित शहा यांना हिटलर होण्यापासून वाचवा’, असे ओवेसी लोकसभेत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे खासदरा भडकले. त्यांनी ओवेसी यांना आपले वक्तव्य मागे घेण्याचे सांगितले. अखेर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ओवेसी यांचे हे विधान संसदीय कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -