घरदेश-विदेशकेरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर आजपासून खुले; भाविकांच्या दर्शनासाठी निश्चित वेळ

केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर आजपासून खुले; भाविकांच्या दर्शनासाठी निश्चित वेळ

Subscribe

केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये हे मंदिर बंद करण्यात आले होते. मंदिर खुले झाले असले तरी येथे भाविकांच्या दर्शनासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ८ ते ११ या तर सायंकाळी ५ ते संध्याकाळीच्या दीप आराधनेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक होते. त्यामुळे लोकांची गर्दी होऊ शकणारी ठिकाणे केंद्र तसेच राज्यांनी बंद केली. त्यामध्ये मंदिरांचाही समावेश होता. तसेच मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन असून जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्राने मंदिरं उघडण्याची परवानगी दिली असली तरी त्या त्या राज्यांवर अंतिम निर्णय सोपवला आहे. त्यामुळे केरळ सरकारने आजपासून तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध असलेले पद्मनाभस्वामी मंदिर हे भाविकांसाठी खुले केले आहे. तसेच महाराष्ट्रातही मंदिरे खुले करण्याची मागणी काही राजकीय नेते तसेच लोकांकडून होत आहे. मात्र ठाकरे सरकारने अद्याप मंदिरांबाबत निर्यण घेतलेला नाही.

हेही वाचा –

Sushant Case : रिया शवगृहात गेली कशी?; कूपरसह पोलिसांनाही मानवाधिकार आयोगाची नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -