घरदेश-विदेशपाकिस्तानात चालत्या ट्रेनमध्ये भीषण स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू

पाकिस्तानात चालत्या ट्रेनमध्ये भीषण स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू

Subscribe

इस्लामाबाद – पेशावरहून क्वेट्टाला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चिचवतनी रेल्वे स्थानकाजवळ जाफर एक्स्प्रेस आली असता हा स्फोट झाला. या स्फोटोता दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी आहेत.

गेल्याच महिन्यात जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाला होता. या घटनेला महिनाही उलटत नाही तोवर पुन्हा एकदा याच एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाला आहे. ट्रेनच्या बोगी क्रमांक सहामध्ये हा स्फोट झाला. या बोगीमधून एक प्रवासी सिलिंडर घेऊन प्रवास करत होता. त्याने ट्रेनच्या टॉयलेटमध्ये हा सिलिंडर लपवून ठेवला होता. याच सिलिंडरचा ट्रेनमध्ये स्फोट झाला असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बाबर अली यांनी दिली. पोलीस, बचावकार्य पथक, बॉम्ब स्कॉड घटनास्थळी दाखल झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – श्रीमंतांचा पाकिस्तानला रामराम, आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी करवाढीचा प्रस्ताव

जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोटाची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात या ट्रेनमध्ये असाच एक स्फोट झाला होता, ज्यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात जाफर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते.

- Advertisement -

३० जानेवारी रोजी पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पठण सुरू असतानाच बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले होते. ही घटना पेशावर पोलीस लाईन जवळ घडली. तसेच या बॉम्बस्फोटात मशिदीची भींत पडली होती.

हेही वाचा – पाकिस्तानात आणखी एक बॉम्बस्फोट; बाजूलाच खेळत होते दोन खेळाडू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -