घरताज्या घडामोडी'सत्यमेव जयते' पार्थ पवारांचे ट्विट; तर नितेश राणे म्हणतात 'बेबी पेग्विन तो...

‘सत्यमेव जयते’ पार्थ पवारांचे ट्विट; तर नितेश राणे म्हणतात ‘बेबी पेग्विन तो गियो’

Subscribe

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता CBI करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत मुंबई पोलिसांनी सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येताच. राज्यातील भाजप नेत्यांचेही ट्विट्स आले. यात सर्वात लक्ष्यवेधी ट्विट ठरले आहे पार्थ पवार यांचे. सुशांत प्रकरणात सीबीआयने तपास करावा असे पत्र गृहमंत्र्यांना दिल्याच्या कारणावरुन शरद पवारांनी पार्थचे जाहीर कान उपटले होते. मात्र त्यानंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे आजच्या ट्विटवरुन दिसत आहे.

- Advertisement -

गृहखाते राष्ट्रवादीकडेच असतानादेखील पार्थ पवार यांनी मुंबई पोलीस करत असलेला तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विरोधकांनी आणि माध्यमांनी महाविकास आघाडीला याबाबत प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी पार्थ अपरिपक्व असल्याचे विधान केले होते. त्यानंतर पवार कुटुंबियांत वाद निर्माण झाले होते.

तर दुसरीकडे कणकवलीचे आमदार आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील “अब बेबी पेग्विंन तोह गियो, इट्स शोटाईम” असे ट्विट केले आहे. नितेश राणे हे देखील सुशांत सिंह प्रकरणात सुरुवातीपासून राज्य सरकारवर टीका करत आले होते.

- Advertisement -

तसेच भाजपचे नेते, माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी देखील ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!” “सिंघम” चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही?
कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही? कुणी मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?” असे काही प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -