घरताज्या घडामोडीPatanjali : पतंजलीवर पुन्हा कारवाई; बिस्कीटाचे वजन कमी भरल्याने सव्वा लाखाचा दंड

Patanjali : पतंजलीवर पुन्हा कारवाई; बिस्कीटाचे वजन कमी भरल्याने सव्वा लाखाचा दंड

Subscribe

काही दिवसांपूर्वी भ्रामक जाहिराती केल्याने पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर माफी मागितली होती. अशात, पुन्हा एकदा बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा कारवाईचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी भ्रामक जाहिराती केल्याने पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर माफी मागितली होती. अशात, पुन्हा एकदा बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा कारवाईचा सामना करावा लागत आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Patanjali biscuit weight gone less than printed figure fined for 1 lakh 20 thousand)

मिळालेल्या माहितीनुसार, योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना इंदूर येथील डी-मार्टमध्ये हे प्रकरण उघडकीस आले. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात महेंद्र जाट नावाच्या एका ग्राहकाने कनाडिया येथील डी मार्ट या स्टोअरमधून 800 ग्रॅमचा पतंजलीचा बिस्कीटाचा पुडा खरेदी केल होता. या बिस्कीटाच्या पुड्यासाठी जाट यांनी 125 रुपयेही मोजले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Bombay High Court : जबाब नोंदविताना वेळेचे बंधन पाळा, उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले

मात्र, बिस्कीटाचा पुडा खरेदी केल्यानंतर शंका आल्याने जाट यांनी संबंधित पुड्याचे वजन केले. त्यावेळी वजनाबाबत त्यांना शंका आल्याने त्यांनी ग्राहक न्यायालयाला तक्रार केली. त्यावेळी हे प्रकरण ग्राहक समिती न्यायालयाने वजन नियामक विभागाकडे सोपवले.

- Advertisement -

त्यानंतर वजन नियामक विभागाने या बिस्कीटाच्या पुड्याची अधिक तपासणी केली. या तपासणीनंतर 800 ग्रॅम असे छापील वजन असणाऱ्या पुड्याचे वजन प्रत्यक्षात 746.70 ग्रॅम इतकेच होते. पुड्याचं वजन तब्बल 53 ग्रॅमने कमी भरले होते. त्या 53 ग्रॅमची साधारण किंमत 7 रुपये इतकी होती. परिणामी, विभागाने पतंजली आणि डी-मार्टला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांनी वजन कमी असल्याचे मान्य केले. त्यामुळे विभागाने पतंजली कंपनीवर 1 लाख 20 हजार रुपयांचा तर डीमार्टवर 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची माफी

भ्रामक जाहिराती केल्याने पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर माफी मागितली होती. तसेच, आपल्या चुकीविषयी खेद व्यक्त करत पुन्हा असे घडणार नाही, अशी ग्वाही देणारे प्रतिज्ञापत्र बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठापुढे सादर केले.


हेही वाचा – Politics : राजकारणात 10 क्रिकेटर्सची एन्ट्री; काही संसदेपर्यंत पोहचले तर काहींची सुरुवातच खराब झाली

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -