घरमहाराष्ट्रST Bus : गावी जाण्यासाठी मुंबईकरांची लालपरीला पसंती, प्रवाशांसाठी प्रवासी मित्रांची नियुक्ती

ST Bus : गावी जाण्यासाठी मुंबईकरांची लालपरीला पसंती, प्रवाशांसाठी प्रवासी मित्रांची नियुक्ती

Subscribe

गेल्या दोन दिवसांत मुंबईतील लाखो प्रवाशांनी एसटीने प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाण्यासाठी मुंबईकरांनी एसटीला प्रसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्याने आणि मुलांना शाळेला सुटी असल्याने आता मुंबईकरांचे पाऊल गावाच्या दिशेने वळू लागले आहेत. गावी जाण्यासाठी मुंबईकर लगबग करत असून यासाठी आता रेल्वे स्थानक, एसटी बस डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. पण, यंदाच्या उन्हाळ्यात एसटी प्रशासनाला चांगले दिवस आले आहेत, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, कारण गेल्या दोन दिवसांत मुंबईतील लाखो प्रवाशांनी एसटीने प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाण्यासाठी मुंबईकरांनी एसटीला प्रसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. (ST bus prefer by Mumbaikar for travel in Village)

सध्या मुंबई विभागामधील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांमधून 250 एसटी बसेस मुंबईच्या बाहेर जात आहेत. पण यामध्ये आता अतिरिक्त 15 गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांकडून एसटीला मिळणारी पसंती आणि प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता, एसटीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. साधारणतः मुंबईतून दररोज 40 हजारांपेक्षा अधिक प्रवासी एसटीने प्रवास करतात. परंतु, 13 आणि 14 एप्रिलला हा आकडा 50 हजारांच्यावर गेला आङे.

- Advertisement -

हेही वाचा… Temperature Mumbai : मुंबईसह कोकण विभागातील तापमानात प्रचंड वाढ; उष्णतेच्या लाटेचा IMDचा इशारा

इतर दिवसांच्या तुलनेत 13 आणि 14 एप्रिल रोजी एसटी बस डेपोला प्रवाशांची सर्वाधिक प्रवासी गर्दी पाहायला मिळाली. एसटी महामंडळाकडून महिला, वृद्ध यांना विविध सवलती देऊ केल्या कारणामुळे त्याचा प्रवाशांना तर फायदा होतच आहे, पण त्याचबरोबर एसटीला देखील याचा फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एसटीकडून 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत सेवा देण्यात येते. त्याशिवाय, 65 ते 74 वय असणाऱ्या ज्येष्ठांना 50 टक्के आणि महिलांनाही 50 टक्के सवलत देण्यात येते, ज्यामुळे एसटीचा प्रवास हा अधिक सोयीस्कर झाला आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळाचे ‘प्रवासी मित्र’

एसटी महामंडळाकडून प्रवासी मित्र ही योजना राबविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील काही प्रमुख स्थानकांवर ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी प्रवासी मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रवासी मित्रांच्या मदतीने एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सकाळी 08 ते 11 आणि दुपारी 04 ते रात्री 09 वाजेपर्यंत हे प्रवासी मित्र एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मदत करणार आहेत.

विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रवासी मित्र म्हणून करण्यात येणार आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा थांब्याबाबत मोठा त्रास सहन करावा लागतो. कधी कधी एसटी चालक बस नियोजीत थांब्यावर न थांबवता ती वेगळ्याच ठिकाणी थांबवतात, अशा वेळी प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे आता अशा परिस्थितीत प्रवासी मित्र एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मदत करतील.

हेही वाचा… Bombay High Court : जबाब नोंदविताना वेळेचे बंधन पाळा, उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -