घरमहाराष्ट्रकोकणTemperature Mumbai : मुंबईसह कोकण विभागातील तापमानात प्रचंड वाढ; उष्णतेच्या लाटेचा IMDचा...

Temperature Mumbai : मुंबईसह कोकण विभागातील तापमानात प्रचंड वाढ; उष्णतेच्या लाटेचा IMDचा इशारा

Subscribe

Temperature Mumbai गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. शिवाय अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. शिवाय अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अशात, मंगळवारी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. (Temperature Mumbai Meteorological Department Predicts That The Temperature Will Increase In Maharashtra)

उन्हाळा सुरू झाल्यापासून साधारण 38 अंशांच्या आसपास असलेल्या बदलापूर शहराच्या तापमानात सुमारे चार अंशांची वाढ झाली आहे. मंगळवारी बदलापूरमधील तापमान 43 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात साधारण गुरूवारपर्यंत तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत सोमवारपासून तापमानाचा पारा पुन्हा चढता राहणार आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा चढण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Monsoon 2024 : यंदा पाऊस 100 टक्के पार; IMD ने वर्तविला अंदाज

मराठवाड्यात 3 ते 5 अंशांनी कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून, उष्णता निर्देशांकही 40 ते 50 अंशांदरम्यान असू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. 18 एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे तुरळक ठिकाणी उष्णता निर्देशांक अधिक नोंदला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईत मंगळवारी 37.9 अंश सेल्सिअस सांताक्रूझ येथे तर, कुलाबा येथे 34.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील विरार येथे 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दरम्यान, एकिकडे तापमानात वाढ होत असली तरी दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागांच हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिले आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरात किती तापमान?

  • सांताक्रूझ – 37.9
  • विरार – 39.1
  • नवी मुंबई – 41.5
  • ठाणे – 41.6
  • कल्याण – 42.4
  • बदलापूर – 42.5
  • मुरबाड – 43.2
  • कर्जत – 43.7

हेही वाचा – BMC : पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालिका, रेल्वे प्रशासन सज्ज

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -