घरदेश-विदेशBombay High Court : जबाब नोंदविताना वेळेचे बंधन पाळा, उच्च न्यायालयाने ईडीला...

Bombay High Court : जबाब नोंदविताना वेळेचे बंधन पाळा, उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले

Subscribe

ईडीने 12-12, 14-14 तास एखाद्या व्यक्तीची चौकशी करून त्याचा जबाब नोंदविले असल्याचा अनेकदा घडले आहे. याच प्रकरणावरून आता मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ईडी अधिक वेगवान झाली असून मनी लाँड्रिंगच्या अनेक प्रकरणात ईडीकडून आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने 12-12, 14-14 तास एखाद्या व्यक्तीची चौकशी करून त्याचा जबाब नोंदविले असल्याचा अनेकदा घडले आहे. याच प्रकरणावरून आता मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले आहे. ईडीने ठराविक वेळेतच एखाद्या व्यक्तीची चौकशी करून जबाब नोंदवावा, मुळात रात्री एखाद्या व्यक्तीच्या झोपेवर गदा न आणता त्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी ठराविक वेळेत जबाब नोंदवावा, असे स्पष्टपणे सांगितले. (Bombay High Court orders ED to observe time limit while filing reply)

प्रत्येकाला रात्री झोपण्याचा अधिकार आहे. रात्री झोपू न देणे म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळेत जबाब नोंदवू नका. जबाब कधी नोंदवावा यासाठी वेळेचे नियम तयार करा. तसे त्यासंदर्भातील परिपत्रक काझा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीला देण्यात आले आहेत. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ईडीला आता न्यायालयाकडून आलेल्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

- Advertisement -

मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जबाब नोंदवण्याचे समन्स पाठवताना त्यामध्ये वेळही नमूद करा. त्याबाबतचे संपूर्ण स्पष्टीकरण परिपत्रकात द्या, असा आदेशही न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता ईडीला न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत वेळेबाबतची माहिती लवकरात लवकर सादर करावी लागणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी 09 सप्टेंबर 2024 पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने ईडीला जबाब नोंदविण्याबाबतच्या नियमावलीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा… Salman Khan News : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक

- Advertisement -

ईडीकडून रात्री-बेरात्री देखील जबाब नोंदविण्यात येत असल्यासंदर्भातील याचिका गुजरात येथील राम इस्सरानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीला आदेश देण्यात आले आहेत. राम इस्सरानी यांनी ईडीने पाठवलेले समन्स व अटकेविरोधा याचिका केली होती. जबाब नोंदवण्यासाठी ईडीने त्यांना गेल्या वर्षी समन्स पाठवले. हे चौथे समन्स होते. सकाळी साडेदहा ते दुसऱया दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ईडीने जबाब नोंदवला, असे इस्सरानी यांनी याचिकेच्या माध्यमातून सांगितले.

त्यामुळे संविधानाने झोपण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येकाला दिला आहे. तरीही ईडीने झोपू दिले नाही. जबाब नोंदवण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलवता आले असते. पण ईडीकडून तसे करण्यात आले नाही, असा दावा राम यांनी याचिकेत केला होता. त्यामुळे न्यायालयाकडून याबाबतची सुनावणी करण्यात आली असून न्यायालयाने इस्सरानी यांना कोणताही दिलासा न देता ही याचिका फेटाळून लावली. मात्र, ईडीवर त्यांच्या कामासंदर्भात ताशेरे ओढले आहे.

ईडीचे अधिकारी हे पोलीस नाहीत, असे न्यायालयाकडून एका प्रकरणात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ईडीने जबाब नोंदवणे ही न्यायिक प्रक्रिया आहे हे विसरू नका. जबाब नोंदवण्यासाठी वेळेचे बंधन असायला हवे. रात्रीच्या वेळेत झोप येणे. डोळे वारंवार बंद होणे ही सामान्य क्रिया आहे. रात्रीच्या वेळेत झोपू न दिल्यास त्याचा निश्चितच परिणाम आरोग्यावर होतो. मानसिक क्षमता व संज्ञात्मक कौशल्य बिघडू शकते. समन्स संशयिताच्या आरोग्यावर बेतता कामा नये, असेही न्यायालयाकडून ईडीला सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Central Railway : मध्य रेल्वेचे 172 वर्षात पदार्पण; रेल्वे ते वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया…


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -