घरCORONA UPDATEकोरोनाचे 'हे' औषध पतंजली उद्या करणार लाँच

कोरोनाचे ‘हे’ औषध पतंजली उद्या करणार लाँच

Subscribe

योगगुरू रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून कोरोना विषाणूचे आयुर्वेदिक औषध करणार लाँच

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या साथीने झगडत आहे. भारतातही या महामारीने कहर केला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या आजाराची औषधे शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान असा दावा केला जात आहे की, या रोगाचे औषध वर्षाच्या अखेरीस तयार केले जाईल. पतंजली आयुर्वेदने भारतात मोठा दावा केला असून योगगुरू रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून कोरोना विषाणूचे आयुर्वेदिक औषध लाँच करण्याविषयी सांगितले आहे.

- Advertisement -

त्यांनी असे ट्वीट केले की, “पतंजली योगपीठ उद्या मंगळवारी १ वाजता हरिद्वार येथून कोरोनाच्या एविडेंस बेस्ड फर्स्ट आयुर्वेदिक मेडिसिन कोरोनिलच्या संपूर्ण वैज्ञानिक कागदपत्रासह लॉंच करत आहे.”

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या ४ लाख २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद केली गेली आहे, या रुग्णांमध्ये १३ हजार ६९९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी २ लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनाचा पराभव केला आहे, तर सध्या देशात १ लाख ७४ हजार ३८७ सक्रिय रुग्णांची नोंद आहे.

- Advertisement -

देशातील कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसला आहे. रविवारी महाराष्ट्रातून कोरोना संक्रमणाचे ३ हजार ८७० नवीन रुग्ण सापडले आले. राज्यात १ लाख ३२ हजारांहून अधिक संसर्गाची नोंद झाली आहे. यापैकी ६५ हजार ७४४ लोक बरे झाले आहेत तर ६० हजार १४७ लोकांवर उपचार सुरू असून राज्यात ६ हजार १७० लोकांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनावर औषध तयार करणारी कंपनी झाली मालामाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -