घरदेश-विदेशफेथईचा फटका विषाखापट्टणमला, विमानसेवांवर परीणाम

फेथईचा फटका विषाखापट्टणमला, विमानसेवांवर परीणाम

Subscribe

आंध्रप्रदेशमधील वातावरणाचा प्रवासी सेवांवर परीणाम झाला आहे. सकाळी विशाखापट्टणम येथे येणारी विमाने हैदराबाद विमानतळाकडे वळवण्यात आली. त्यानंतर इंडिगोची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून फेथई वादळ आंध्रप्रदेशमध्ये धडकले आहे. आज सकाळपासूनच आंध्रप्रदेशात ठिकठिकाणी वारे वाहत आहेत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. खबरदारी म्हणून येथील विशाखापट्टणम विमानतळावरील सगळ्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. संपूर्ण आंध्रप्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही परिस्थिती आंध्रप्रदेशमध्ये संध्याकाळपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तो पर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विमानसेवा आणि अन्य सेवांवर झाला परीणाम

आंध्रप्रदेशमधील वातावरणाचा प्रवासी सेवांवर परीणाम झाला आहे. सकाळी विशाखापट्टणम येथे येणारी विमाने हैदराबाद विमानतळाकडे वळवण्यात आली. त्यानंतर इंडिगोची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली. इंडिगोने या संदर्भातील माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील प्रवासी ग्राहकांना दिली होती. शिवाय ही सेवा लवकरच सुरु होईल,अशी आशा व्यक्त केली होती. सध्या येथील वातावरणामुळे अनेक विमाने दुसऱ्या विमानतळावर वळवण्यात आली. तर पॅसेंजर ट्रेन्सही रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

वादळाने घेतला एकाचा बळी

वादळाचा तडाखा विजयवाडाजवळील गावातही बसला या ठिकाणी दरड कोसळली. यात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोसाट्याचा वारा आणि समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे अनेक गावांचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -