घरमहाराष्ट्रसरकारी नोकरीचं आमिष, मंत्रालयातच मुलाखती; शिपायाचा बनाव पोलिसांनी उधळला

सरकारी नोकरीचं आमिष, मंत्रालयातच मुलाखती; शिपायाचा बनाव पोलिसांनी उधळला

Subscribe

याच कटातील दुसरा ठग नितीन साठे सामान्य प्रशासन विभागामध्ये सचिव पदावर असल्याचं सांगण्यात आलं. तसंच, त्याच्या केबिनमध्ये मुलाखतीही पार पडल्या. आता चक्क मंत्रालयातच मुलाखत होत असल्याने भरती प्रक्रिया अधिकृत असल्याचं स्पष्ट झालं.

मुंबई – सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवून गंडा घालण्याचे प्रकार नियमित समोर येतात. मात्र, मंत्रालयात तर अशापद्धतीने बोगस लिपिक पदाची भरती राबवली गेली, ज्याचा तपशील वाचल्यास तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या फसवणुकीतून ६० लाखांचा अपहार झाल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी चार शिपयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालाड येथे राहणाऱ्या सागर जाधव याची त्याच्या वडिलांच्या मित्रामार्फत महेंद्र सकपाळ याच्याशी ओळख झाली होती. महेंद्र सकपाळ याने नितीन साठे याच्यासोबत ओळख करून देत मंत्रालयात नोकरीला लावण्याचे आमिष दिले. मात्र, या नोकरीसाठी सागरला लाखो रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, सागरने तीन भांवडांचे मिळून ९ लाख रुपये आणि कागदपत्रे दिली. ठगांनी असा कट रचला होता की समोरच्याला आपण फसवले जातोय याचा थांगपत्ताही लागला नसता. नोकरीसाठी वैद्यकीय तपासणी करावी लागते असं सांगून त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्याला पोस्टिंगच्या लेटरसहीत रीतसर पेपर काढलेले दाखवले. तसेच, त्यावर जे.जेच्या स्वाक्षरीही घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यभरातील 7135 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल होणार जाहीर

याच कटातील दुसरा ठग नितीन साठे सामान्य प्रशासन विभागामध्ये सचिव पदावर असल्याचं सांगण्यात आलं. तसंच, त्याच्या केबिनमध्ये मुलाखतीही पार पडल्या. आता चक्क मंत्रालयातच मुलाखत होत असल्याने भरती प्रक्रिया अधिकृत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा लाख ठगांनी मागितले. पैसे भरल्यानंतर विभागप्रमुखांची सही घेऊन रुजूपत्र, ओळखपत्र आणि किट देणार असल्याचे सांगितले. याच कटातील आणखी एक ठग सचिन डोळस याने आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. सतत पैशांची मागणी होत असल्याने संशय बळावला. कारण या लोकांनी आणखी काही लोकांकडून पैसे घेतले असल्याचं समोर आलं. आपली फसवणूक होत असल्याचं समजताच दहा जणांनी पोलिसांत धाव घेतली आणि हेंद्र नारायण सकपाळ, महादेव शेदु शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक साठे अशा चौघांविरोधात तक्रार दाखळ केली. ही चौकडी सध्या फरार आहे. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथके मुंबईबाहेर रवाना झाली आहेत. या चौकशीतून किती लोकांना फसण्यात आलं आहे, या कटात मंत्रालयातील किती कर्मचारी सहभागी होते, याचा शोध घेतला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -