घरताज्या घडामोडी'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' नामक पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ नामक पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एक वादग्रस्त पुस्तकाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या पुस्तकाचं नावं ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ असं असून या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात करण्यात आलं आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे. याशिवाय पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, अशी भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे.

भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे प्रदेशध्याक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक जय भगवान गोयल यांनी लिहिलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्यामुळे या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तक प्रकाशनाची माहिती फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सीएएबद्दल तरुणांमध्ये अफवा पसरवून दिशाभूल केली जातेय’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -