Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कर्नाटकात उद्या मतदान; पंतप्रधानांनी पत्राद्वारे जनतेला केले आवाहन, म्हणाले...

कर्नाटकात उद्या मतदान; पंतप्रधानांनी पत्राद्वारे जनतेला केले आवाहन, म्हणाले…

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी २२४ उद्या मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकात ५.२ कोटी पात्र मतदारांपैकी ९.१७  लाख पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर्नाटकातील जनतेसाठी पत्र जारी केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर केले असून यात पंतप्रधानांनी कर्नाटकातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

या पंतप्रधान मोदी पत्रात म्हटले, “तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. तुमचे प्रेम मला दैवी वरदानासारखे वाटते. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. कर्नाटकासाठी आमचे व्हिजन साकार करण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था ही पाचवी आहे. पण, जगात आपली अर्थव्यवस्था पुढील तीनमध्ये आणण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्यासाठी हे शक्य आहे, जेव्हा कर्नाटकाची अर्थव्यवस्था $१ ट्रिलियनची होईल.”

- Advertisement -

“कोविडच्या काळात कर्नाटकातील भाजपचे सरकारने परकीय गुंतवणुकीच्या रुपात वार्षिक ९०, ००० कोटी रुपये मिळाले आहेत. यापूर्वी कर्नाटक सरकारच्या काळात सुमारे ३०,००० कोटी रुपये होते. कर्नाटकात गुंतवणूक, नवोन्मेषात, उद्योग, रोजगार आणि उद्योजकतेमध्ये प्रथम क्रमांकावर आणण्याचे आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आले तर पुढच्या पिढीसाठी शहरीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, वाहतुकीचे आधुनिकीकरण, ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनमान सुधारण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे”, असे पंतप्रधानांनी पत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी २२४ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकात ५.२ कोटी पात्र मतदारांपैकी ९.१७  लाख पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. भाजपने २२४, काँग्रेस २२३ आणि जेडीएसने २०७ जागांवर उमेदवार दिला आहे.

 

- Advertisment -