घरदेश-विदेशआज 'मन की बात'वर कॉन्क्लेव्ह; दिग्गज राहणार उपस्थित

आज ‘मन की बात’वर कॉन्क्लेव्ह; दिग्गज राहणार उपस्थित

Subscribe

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला ३० एप्रिलला १०० भाग पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. यासाठी प्रसार भारतीने आज ‘मन की बात’वर एक  कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी ३ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘मन की बात’ची सुरू केली होती.

या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थितीत राहणार आहे. त्यांच्याबरोबर बॉलिवडू अभिनेता अमिर खान, अभिनेत्री रविना टंडन आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी हे देखील हजेरी लावणार आहे. यावेळी पर्यावरण, जल संरक्षण, महिला, क्रीडा, चित्रपट विविध क्षेत्रांतील १०७ मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ‘मन की बात’चे १०० भाग पूर्ण होण्याच्यानिमित्ताने १०० रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे विशेष टपाल तिकीट देखील जारी करणार आहेत.

- Advertisement -

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्घाटन, समारोप, कॉन्क्लेव्हसह चार सत्रे असणार असून मन की बात या कार्यक्रमात सामाजिक परिणाम आणि कार्यक्रमाचे यश आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

मन की बात @ १०० आणि प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस वेमपती यांनी लिहिलेले ‘कलेक्टिव्ह स्पिरिट, कॉंक्रिट अॅक्शन’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मन की बात कार्यक्रमानिमित्ताने बनविलेल्या टपाल तिकीट आणि १०० रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहेत.

- Advertisement -

क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी स्टेशनवर ‘मन की बात’ ऐकतील

पंतप्रधानांच्या १०० व्या मन की बात या कार्यक्रमानिमित्ताने देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर क्यूआर कोड स्थापित करण्यात येणार आहे. यामुळे तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा रेल्वे स्टेशनवर उपस्थित असाल तर, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने स्टेशनवर असलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा आणि थेट पंतप्रधानाच्या कार्यक्रामात सहभागी होऊ शकता.

दिग्गजांसोबत चर्चा सत्र

नारी शक्ती – बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन, निवृत्त आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी, अॅथलीट दीपा मलिक, द बेटर इंडियाचे सीईओ धीमंत पारेख, बॉक्सर निखत झरीन आणि गिर्यारोहक पूर्णा मलावत.

आत्मनिर्भरतेवर जनसंवाद होणार

उद्योजक संजीव बिकचंदानी, आरजे रौनक, पद्मश्री टीव्ही मोहनदास पै, उद्योजक रवी कुमार नारा आणि दल लेक लोटस स्टेम प्रोड्यूसर कंपनीचे प्रमुख मोहम्मद अब्बास भट आदी दिग्गज व्यक्तीसोबत आत्मनिर्भरतेवर जनसंवाद होणार आहेत.

मन की बात कार्यक्रमातील महत्त्वाची माहिती

  • प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी हे मन की बात कार्यक्रम होतो.
  • मन की बातचा पहिला भाग १४ मिनिटांचा, दुसरा भाग १९ मिनिटांचा, तिसरा भाग २६ मिनिटांचा होता. यानंतर मन की बात या कार्यक्रम ३० मिनिटांचा झाला.
  • मन की बात हिंदी, इंग्रजीसह २२ भारतीय भाषा आणि ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो.
  • या कार्यक्रमाचा १०० वा भाग ३० एप्रिल रोजी रेडिओ स्टेशनवर प्रसारित होणार आहे

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -