घरदेश-विदेश'त्या' वक्तव्यावरुन प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल

‘त्या’ वक्तव्यावरुन प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि यूनिसेफची ब्रँड अँबेसिडर प्रियंका चोप्रा हीने नुकतेच बांग्लादेश येथील रोहिंग्या निर्वासितांच्या कॅम्पला भेट दिली. या भेटी दरम्यानचे फोटो तिने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटो सोबत लिहिलेला मजकूर आता प्रियंकाला चांगलाच भारी पडला आहे. कारण तिच्या या पोस्टवर अनेकांनी टीकेचा भडीमार केला आहे.

प्रियंका चोप्राने सोमवारी बांग्लादेश येथील कॉक्स बाजार या सर्वात मोठ्या रिफ्यूजी कॅम्पला भेट दिली होती. या भेटी दरम्यान तिने रोहिंग्या निर्वासितांबरोबर फोटो काढले व ते सोशल मीडियावर शेअर केले. ऑगस्ट २०१७ पासून एकूण सात लाख रोहिंग्यांनी म्यानमार येथून पलायन केले. सध्या हे निर्वासित रोहिंग्या बांग्लादेश येथे स्थलांतरित झाले आहेत. आपल्या बांग्लादेश येथील यात्रे दरम्यान प्रियंकाने हे फोटो आणि व्हिडिओ टाकले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

” ही मुले आपले भविष्य असल्यामुळे जगाला आणि आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. या लोकांमधील अनेकांनी येथे येण्यासाठी खूप लांबचा प्रवास केला तर डोंगर दऱ्या आणि नद्या पार करुन हे येथे आले आहेत. यामधील अनेक तरुणांना लहान वयातच मरण आले. यातील मुलांनी संपूर्ण आयुष्य शारिरीक आणि मानसिक यातना सहन केल्या आहेत.” – प्रियंका चोप्रा

 

तेच दुसऱ्या बाजूने लोकांनी कंमेट केली आहे की, चांगल्या कामांची सुरुवात नेहेमी स्वतःच्या घरापासून करावी. काय तुम्ही निर्वासित रोहिंग्यांच्या मुलांना दत्तक घेणार आहात का ???

किंवा तुम्ही रोहिंग्यां बरोबर लग्न करणार आहात का असे प्रश्न विचारले जात आहे.
लोकांनी केलेल्या कमेंटमुळे ट्रोल झालेली प्रियंका ही ‘द प्रियंका चोप्रा फाउंडेशन फॉर हेल्थ अँड एज्युकेशन’ संस्थेसाठी काम करते. आपल्या कमाईचा दहा टक्के वाटा ती या फाउंडेशनला देते. ही फाउंडेशन गरजवंत मुलांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मदत करते. साल २०१० मध्ये यूनिसेफची ब्रँड अँबेसिडर बनलेल्या प्रियंकाने पिडीत मुलांचे प्रश्न जगासमोर मांडले होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -