नुपूर शर्माच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर कतार, कुवैत, इराणची नाराजी, भारतानं केला खुलासा

अखिलेश यादव यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपनं नुपूर शर्मावर निलंबनाची कारवाई फक्त दाखवण्यापुरती केली आहे. इतर कोणतीही महत्त्वाची पावलं उचलली नाहीत. वादग्रस्त विधानाबाबत भाजपचे निलंबन झालेले आता मंत्रिपदी बसलेले आहेत, असं ट्विट करत अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

bjp party's clear statement on the controversial statement of spokesperson Nupur Sharma

नवी दिल्लीः Nupur Sharma Case: नुपूर शर्माकडून पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर कानपूरमध्ये मुस्लिम समुदायाद्वारे मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि विरोध प्रदर्शन करण्यात आलं आहे. कानपूरच्या आरोपींवर राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारकडूनही कडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नुपूर शर्माला भाजपने पार्टीतून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. परंतु आता मुस्लिम संघटनांकडून नुपूर शर्मांच्या विरोधात अटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणात नुपूर शर्मावर सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईला उत्तर प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी दिखावा म्हटलं आहे.

समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपनं नुपूर शर्मावर निलंबनाची कारवाई फक्त दाखवण्यापुरती केली आहे. इतर कोणतीही महत्त्वाची पावलं उचलली नाहीत. वादग्रस्त विधानाबाबत भाजपचे निलंबन झालेले आता मंत्रिपदी बसलेले आहेत, असं ट्विट करत अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

कुवैत, इराण, कतारमध्ये नाराजी

नुपूर शर्मानं पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टीकेनंतर नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. असं म्हणतात, बाहेरील ताकदीच्या दबावानंतर भाजपनं हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे कतार, ईराण आणि कुवैतने पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या विधानानंतर रविवारी भारतीय दूतावासांना नोटीस पाठवली आहे. खाडीतील इतर देशांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. कतार आणि कुवैतमध्ये भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्यांनीही याबाबत एक निवेदन जारी केलंय. भारत सरकार अशा कोणत्याही विचारांशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे.

मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वादग्रस्त विधानाप्रकरणी नुपूर शर्माविरुद्ध मुंबई आणि हैदराबादमध्ये अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर शर्मा यांच्याविरुद्ध IPCच्या कलम 153A, 5295A, 05B अंतर्गत मुंबईत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचप्रमाणे हैदराबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शर्मा यांच्याविरुद्ध सायबर क्राईम पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 505 (2), 506, 153 (ए), 504 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नुपूर शर्मा भाजपमधून निलंबित

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरु असलेल्या टीकेच्या झोडनंतर भाजपने आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. नुपूर शर्मा आणि नविन जिंदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजप दिल्लीचे प्रदेश मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनासुद्धा निलंबित करण्यात आले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर सांप्रदायिक धार्मिक मुद्द्यावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. तसेच हे भाजपच्या मूळ विचारांच्याविरोधात आहे. नुपूर शर्मांबाबत जारी केलेल्या पत्रात त्यांनी पार्टीच्या विचारांच्याविरुद्ध विचार व्यक्त केल्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा ः चारधाम तीर्थयात्रेस जाणारी बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू