देशात कोरोनाचे 4000 हून अधिक नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांहून अधिक

देशभरात कोरोना रुग्णांमध्ये (Corona Virus) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,518 नवीन रुग्ण आढळले आहेत.

corona

देशभरात कोरोना रुग्णांमध्ये (Corona Virus) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,518 नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी देशात 4,270 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 2,779 जण कोरोनामुक्त झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची (Active Corona Patients) संख्या 25,782 आहे. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 30 हजार 852 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण 4 कोटी 31 लाख 81 हजार 335 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोनामुळे (Covid 19) आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 701 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – Mask Compulsory : राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू

तामिळनाडूमध्ये BA4 आणि BA5 प्रकाराची 12 रुग्ण

तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) ओमिक्रॉनच्या BA4 आणि BA5 प्रकारांची बारा प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंत्री मा. सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार दिली की 150 नमुन्यांपैकी 12 नमुने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये नवीन प्रकारांची पुष्टी करण्यात आली आहे. BA-4 प्रकार चार जणांमध्ये आढळून आला आहे, तर BA-5 प्रकार आठ जणांमध्ये आढळून आला आहे.

हेही वाचा – यंदाची वारी कोरोना निर्बंधमुक्त असणार, राज्य सरकारचा वारकऱ्यांना दिलासा

रुग्णांची आकडेवारी

  • सक्रिय रुग्णांची संख्या : 25,782
  • कोरोनामुक्त रुग्णांची संख्या : 4,26,30,852
  • मृत्यू रुग्णांची संख्या : 5,24,701

देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील (Maharashtra) आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी मास्क (Mask) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय राज्यातील लसीकरणातही (Vaccination) वाढ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.


हेही वाचा – Missile Test: अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला करारा जवाब, एकाच वेळी केली ८ क्षेपणास्त्रांची चाचणी