घरदेश-विदेशQuad Meeting 2022 : Quod लीडर्स देशांची आज बैठक; रशिया-युक्रेन मुद्द्यावर चर्चेची...

Quad Meeting 2022 : Quod लीडर्स देशांची आज बैठक; रशिया-युक्रेन मुद्द्यावर चर्चेची शक्यता, भारत, अमेरिका बैठकीत सहभागी

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. दरम्यान यूएनजीएच्याबैठकीतही युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध केले जात आहे. यावेळी रशियाच्या विरोधात 141 देशांनी मतदान केले तर 5 देशांनी फक्त रशियाच्या बाजूने मतदान केले, मात्र 35 देशांनी यात सहभाग घेतला नाही. दरम्यान रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक शहरं बेचिराख झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज क्वाड देशांनी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही बैठक होणार असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सहभागी होणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानचे राष्ट्रपती देखील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या बैठकीतही रशिया- युक्रेनमधील युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने केला आहे. यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलेय. खारकीवमध्ये भारतीयांना ओलीस ठेवल्याची कोणतीही माहिती समोर आली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे अरिंदम बागची यांनी सांगितले आहे. एका निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती त्यांनी दिली आहे. तसेच युक्रेन आणि रशियाकडून भारतीय विद्यार्थ्य़ांना सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेय.

दरम्यान Quad लीडर्स देशांच्या आजच्या बैठकीतइंडो-पॅसिफिकमधील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हिंदी महासागरातील त्सुनामीनंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी औपचारिकरित्या युती केली आहे. क्वाड ही चार देशांची संघटना आहे. त्यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश आहे.


Russia-Ukraine War : 3726 भारतीयांना आज युक्रेनमधून मायदेशी परत आणणार; केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची माहिती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -