घरदेश-विदेश'तुघलकी लॉकडाऊन,घंटानाद' ही मोदी सरकारची रणनीती; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

‘तुघलकी लॉकडाऊन,घंटानाद’ ही मोदी सरकारची रणनीती; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशात बाधितांचा आकडा वाढत आहे. देशाच कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारांसाठी वेळेत ऑक्सिजन, बेड आणि लस उपलब्ध होताना दिसत नाही. याचपार्श्वभूमीवर भाजपाची सत्ता असलेल्या केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर आज, शुक्रवारी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा बाधितांच्या होणाऱ्या आकडेवारीवरून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. राहुल गांधी यांनी ट्वीट करून आज पुन्हा एकदा मोदी सरकारवरच्या रणनीतीवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारची कोविड रणनीती म्हणजे स्टेज १ – तुघलकी लॉकडाऊन लावा, स्टेज २ – थाळी वाजवा, स्टेज ३ – प्रभूगान.”

- Advertisement -

 

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वेळोवेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे, गुरूवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत असे म्हटले, “ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला सवाल उपस्थितीत केला आहे.

- Advertisement -

यासोबतच, “३८५ दिवसातही करोनाशी लढाई जिंकता आली नाही – उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या..” असे देखील राहुल गांधींनी म्हणत केंद्र सरकारवर टीका केली होती. ‘वाढत्या कोरोना संकटादरम्यान लसींची कमतरता भासणं ही चिंताजनक समस्या आहे. तर कोणताही उत्सव नाही. आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकून कोरोना लसींचं एक्सपोर्ट करणं योग्य आहे का? केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय मदत करावी. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या महामारीला हरवायचं आहे.’, असं ट्वीट राहुल गांधींनी करत केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने देशाची चिंता अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आजपासून १४ एप्रिलपर्यंत ‘टीका उत्सव’ म्हणजे कोरोना लस उत्सव या मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, तसेच प्रत्येक नागरिकापर्यंत कोरोनाची लस पोहोचावी हा यामागचा मुख्य हेतू होता. मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यात अनेक नेते मंडळी नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबद्दल जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -