घरदेश-विदेशDoctors Day: राहुल गांधींनी आरोग्य कर्मचार्‍यांशी साधला संवाद म्हणाले- तुमचा अभिमान आहे...

Doctors Day: राहुल गांधींनी आरोग्य कर्मचार्‍यांशी साधला संवाद म्हणाले- तुमचा अभिमान आहे…

Subscribe

राहूल गांधीनी वैद्यकीय स्टाफच्या डॉक्टर्स, परिचारिकांचे कौतुक करत आभार देखील मानले

कोरोना संकटात अग्रभागी लढा देणार्‍या डॉक्टरांसाठी आजचा दिवस खास आहे. आज डॉक्टर दिन साजरा केला जात आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकजण आरोग्य कर्मचार्‍यांना अभिवादन करीत आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी डॉक्टर्स दिनानिमित्त जगातील विविध देशांमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय आरोग्य कर्मचार्‍यांशी संवाद साधला.

राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणार्‍या परिचारिकांमध्ये इंग्लंडच्या लिव्हरपूल येथील शिर्ली, एम्स दिल्लीचे विपिन, नरेंद्र (सध्या ऑस्ट्रेलिया) राजस्थानमधील रहिवासी आणि न्यूझीलंडमध्ये कार्यरत असलेली अनु रंगत यांचा सहभाग होता. यापुर्वी देखील राहुल गांधी अनेक डॉक्टर्स, परिचारिकांशी संवाद साधला आहे. यावेळी राहूल गांधीनी वैद्यकीय स्टाफच्या डॉक्टर्स, परिचारिकांचे कौतुक करत आभार देखील मानले आहेत.

- Advertisement -

‘आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे’

ऑस्ट्रेलियातील नरेंद्र सिंग म्हणाले की, ‘आम्हाला प्रथम वाटलं की, हा एक सामान्य फ्लू असेल, परंतु जेव्हा कोविडचा प्रसार होऊ लागला आणि जेव्हा आम्ही रोज ही बातमी ऐकू लागलो आणि जेव्हा इटलीमध्ये दररोज मृत्यूचे प्रमाण वाढत होते, तेव्हा आम्हाला समजले की हा कोणताही सामान्य फ्लू नाही.’

या परिचारिकांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, जगातील विविध देशांमध्ये आपण भारताची प्रतिष्ठा वाढवत आहात, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तसेच, आपल्या संवादात मला जाणून घ्यायचे आहे की, आपण कसे कार्य करीत आहात आणि जगाच्या विविध भागात कोविड -१९ विषयी लोकांची कशी प्रतिक्रिया आहे. हा सर्व स्टाफ वेगवेगळ्या रुग्णालयात काम करतात. राहुल गांधींनी बुधवारी सकाळी ट्विट केले की, डॉक्टर दिनाच्या दिवशी, कोरोना व्हायरसच्या दरम्यान, रुग्णांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये आशा निर्माण करणाऱ्या सर्व वैद्यकीय स्टाफचे मी आभारी आहे.

- Advertisement -

राहुल यांनी विचारले की, जे कोविड रूग्ण नाहित, अशा रुग्णांना देखील यावेळी समस्या उद्भवत असतील, यावर शिर्ली म्हणाले की, यूकेच्या रूग्णालयात आपत्कालीन सेवा सुरू आहेत. रेड आणि ग्रीन झोन तयार केले गेले आहेत. दरम्यान, हा प्रश्न भारताच्या संदर्भात अधिक महत्त्वाचा आहे. मला बर्‍याच रुग्णांचे कॉल आले जे कर्करोगाचे रुग्ण होते परंतु आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकत नसल्याचे विपिन यांनी सांगितले.

एम्समध्ये काम करणारे विपिन यांनी केली तक्रार

कुटुंबाशी संबंधित प्रश्नावर अनु म्हणाले की, न्यूझीलंड सरकारने आमच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. तर विपिन यांनी दावा केला की एम्सच्या दोन परिचारिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, परंतु आतापर्यंत दिल्ली सरकारने १ कोटी दिले नाही. डॉक्टर आणि परिचारिका आम्ही सैन्याप्रमाणे लढा देत आहोत. डॉक्टर आणि परिचारिका यांना जोखीम भत्ता देण्यात आला पाहिजे, असे त्यांनी यावेळी राहुल गांधींशी बोलतांना सांगितले.


Corona: देशात २४ तासांत ५०७ जणांचा मृत्यू, १८ हजाराहून अधिक नव्या रूग्णांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -