घरदेश-विदेशमोदीजी मौन सोडा, चीनला उत्तर द्या; भारत -चीन सीमावादावरून राहुल गांधींची पुन्हा...

मोदीजी मौन सोडा, चीनला उत्तर द्या; भारत -चीन सीमावादावरून राहुल गांधींची पुन्हा पंतप्रधानांवर टीका

Subscribe

यापूर्वीही राहुल गांधी यांनी भारत -चीन सीमावादावरून मोदी सरकारला टार्गेट केले आहे. "मनमोहन सिंह असते तर केव्हाच राजीनामा दिला असता मात्र भाजपवाले खरं लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.'' असा आरोप राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता.

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत चीन संघर्षाचा मुद्दा विरोधकांकडून नेहमीच उपस्थित केला जातो. यात चीनने २०२२ च्या पहिल्याच दिवशी भारताविरोधात कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. चीनने १ जानेवारीला गलवान खोऱ्यात चिनी झेंडा फडकवतानाचा एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

चिनी सैनिकांनी २०२२ या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत गलवान खोऱ्यात चिनी झेंडा फडकवला असा दावा या व्हायरल व्हिडिओतून केला जातोय. मात्र यावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जातोय. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत मौन तोडण्याचे आवाहन करत खोचक टीका केली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, “गलवानवर आपला तिरंगा चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा.”  यापूर्वीही राहुल गांधी यांनी भारत -चीन सीमावादावरून मोदी सरकारला टार्गेट केले आहे. “मनमोहन सिंह असते तर केव्हाच राजीनामा दिला असता मात्र भाजपवाले खरं लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.” असा आरोप राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता.

गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या चकमकी 20 भारतीय जवान शहीद झाले होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत चकमक झालेल्या ठिकाणाहून चीनने दोन किमी अंतर मागे जाण्याचे मान्य केले होते. त्यानंतर भारतीय आणि चिनी सैन्य गलवान खोऱ्यातून दोन्ही बाजूने दोन किमी मागे सरकले. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा त्या भागातला नसल्याचे म्हटले जातेय.


लखीमपूर हिंसाचार घटनेत गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी; 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -