घरदेश-विदेशशरद पवार, उदयनराजे भोसले आणि राजीव सातव यांनी घेतली खासदारकीची शपथ

शरद पवार, उदयनराजे भोसले आणि राजीव सातव यांनी घेतली खासदारकीची शपथ

Subscribe

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज सकाळी ११ वाजता पार पडला. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजप नेते उदयनराजे भोसले आदींनी शपथ घेतली. फौजिया खान यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्या शपथ विधीला उपस्थीत नव्हत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांचा शपथविधी सोहळा राज्यसभेत न होता सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात पार पडला.

देशभरातील एकूण ६२ खासदार निवडून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, उदयनराजे भोसले यांच्या सह प्रियांका चतुर्वेदी, डॉ. भागवत कराड तसंच राजीव सातव यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. दरम्यान यावेळी काही मोजक्याच खासदारांनी शपथ घेतली. त्यामुळे उर्वरित खासदारांची शपथ अधिवेशनावेळी घेतली जाणार आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेता शपथविधी दरम्यान सोशल डिस्टनसिंगची देखील काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे शपथ घेणाऱ्या खासदारांना आपल्या सोबत एकाच व्यक्तीला सोबत आणण्याची परवानगी देण्यात अली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -