घरदेश-विदेशबाबा राम रहिमला दुसऱ्यांदा ४० दिवसांची पॅरोल रजा मंजूर

बाबा राम रहिमला दुसऱ्यांदा ४० दिवसांची पॅरोल रजा मंजूर

Subscribe

राम रहिमला आता पुन्हा ४० दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली आहे. नियमानुसार ही रजा मंजूर झाली आहे, असे रोहतकचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी सांगितले. गेल्यावर्षी १४ ऑक्टोबरला राम रहिमला ४० दिवसांची पॅरोल मंजूर झाली होती. या रजेचा कालावधी संपल्यानंतर २५ नोव्हेंबरला राम रहिम पुन्हा कारागृहात परतला होता.

नवी दिल्लीः स्वतःच्याच महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंगला ४० दिवसांची पॅरोलची रजा मंजूर झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याला अशाच प्रकारे पॅरोलची रजा मंजूर झाली होती.

राम रहिमला आता पुन्हा ४० दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली आहे. नियमानुसार ही रजा मंजूर झाली आहे, असे रोहतकचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी सांगितले. गेल्यावर्षी १४ ऑक्टोबरला राम रहिमला ४० दिवसांची पॅरोल मंजूर झाली होती. या रजेचा कालावधी संपल्यानंतर २५ नोव्हेंबर २०२२ रोजी राम रहिम पुन्हा कारागृहात परतला होता. हरियाणातील पंचायत आणि आदमपूर विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी राम रहीमला पॅरोलची रजा मंजूर झाली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक ही रजा मंजूर केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.

- Advertisement -

राम रहिमने तुरुंगातून बाहेर पडताच सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्या समर्थकांना संदेश दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी दोनदा सत्संगही केला होता. डेरा सच्चा सौदा प्रमुखाचा सत्संग यूट्यूबवर यूपी, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि परदेशात राहणाऱ्या समर्थकांनी ऐकला होता. राम रहीमने यूपीमधून ऑनलाइन सत्संग केला. कर्नाल जिल्ह्यातील साधू सत्संगाला उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील पंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनीही आशीर्वाद घेतले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या.

पुन्हा पॅरोल मिळावा म्हणून राम रहिमने हरियाणा सरकारकडे अर्ज केला होता. हरियाणा सरकारने हा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवला. विभागीय आयुक्तांनी यावर निर्णय घेत राम रहिमला ४० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली. ही रजा मिळाल्यानंतर राम रहिम हे डेरा सच्चाचे माजी प्रमुख शाह सतनाम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. २५ जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे.

- Advertisement -

स्वतःच्याच महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहिमला २० वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणीही त्याला शिक्षा झाली आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -