Ramayana Circuit Train : अखेर रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सच्या साधू संतांसारख्या पेहरावात बदल ; काय झाला वाद ?

पेहरावावरुन झालेल्या गदारोळानंतर आता IRCTCने माघार घेतली आहे.

Ramayana Circuit Train: Finally the change of attire of the waiters in Ramayana Express like saints;
Ramayana Circuit Train : अखेर रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सच्या साधू संतांसारख्या पेहरावात बदल ; काय झाला वाद ?

रामायण सर्किट स्पेशल ट्रेनच्या वेटर्सच्या पेहरावावरुन झालेल्या गदारोळानंतर आता IRCTCने माघार घेतली आहे. उज्जैनच्या ऋषीमुनींनी वेटर्सच्या पेहरावावर तीव्र आक्षेप घेतला होता, या पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सचा गणवेश बदलला आहे. अयोध्या-रामेश्वरम ट्रेनमधील वेटर्स भगवे कपडे घालून भांडी उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संत समाज संतप्त झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उज्जैनच्या संत समाजाने हा साधू-संतांचा अपमान असल्याचे म्हटले होते.यासंदर्भात साधूंनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून ट्रेन थांबवण्याचा इशाराही दिला होता. वाढता वाद पाहता आयआरसीटीसीने वेटर्सचा पोशाखात बदल केला आहे. रामायण सर्किट स्पेशल ट्रेनच्या कर्मचार्‍यांचा पोशाख बदलून प्रोफेशनल युनिफॉर्म करण्यात आल्याचे रेल्वेने ट्विट केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वेचे वेटर भगवे कपडे, धोतर, पगडी आणि संतांप्रमाणे रुद्राक्षाच्या माळा घातलेले जेवणाची भांडी घेऊन जाताना दिसत होते. यावर नाराजी व्यक्त करत उज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज म्हणाले की, हा संत समाजाचा अपमान आहे. वेटर्सचा ड्रेस लवकरात लवकर बदलावा, अन्यथा १२ डिसेंबरला सुटणाऱ्या पुढच्या ट्रेनला संत समाजातर्फे विरोध करण्यात येईल आणि हजारो हिंदूंच्या ट्रेनसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

 


हे ही वाचा – IND vs NZ Test series : भारतीय संघात के.एल राहुलच्या जागेवर सुर्यकुमार यादव; BCCI ने दिली माहिती