घरताज्या घडामोडीगप्प बस, परत विचारलंस तर... पेट्रोल डिझेल दरवाढीवरील प्रश्नावर रामदेवबाबा संतापले

गप्प बस, परत विचारलंस तर… पेट्रोल डिझेल दरवाढीवरील प्रश्नावर रामदेवबाबा संतापले

Subscribe

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या १० दिवसांमध्ये ९ वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यावरुन योगगुरु बाबा रामदेव यांना एका पत्रकाराने प्रश्न केला असता ते अस्वस्थ झाले आणि संतापले होते. मीडियासमोर त्यांची अस्वस्थता दिसून येत होती. बाबा रामदेव पत्रकारावर चिडले आणि धमकावत होते.

हरियाणातील कर्नाल येथे एका कार्यक्रमात एका पत्रकाराने रामदेव बाबांच्या विधानाबाबत प्रश्न केला की, तुम्ही म्हटलं होते लोकांना अशा सरकारसाठी विचार केला पाहिजे जे ४० रुपये प्रति लीटर पेट्रोल आणि ३०० रुपये प्रति लीटर सिलेंडर देऊ शकतील. यावर रामदेब बाबा म्हणाले की, मी असे म्हटलं होतो, तुम्ही काय करु शकता? असा प्रश्न विचारु नका. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा ठेका घेतला नाही. तुम्ही काही प्रश्न विचाराल आणि मी त्याचे उत्तर देईल. पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला की, तुम्ही सगळ्या मीडिया चॅनल्सला बाईट दिला आहे. यावर रामदेव बाबांनी पत्रकाराकडे इशारा करत म्हटले की, मी प्रतिक्रिया दिली होती परंतु आता नाही देत, काय करणार तु? आता शांत बस, जर आता विचारले तर बरोबर नाही. एकदा सांगितले ना मग जास्त उद्धटपणा नको, तु सभ्य आई-बाबांचा मुलगा आहेस असे रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पुढे रामदेव बाबा म्हणाले की, लोकांनी अधिक मेहनत केली पाहिजे. सरकार म्हणतंय जर तेलावरील दर कमी केले तर कर कसा मिळणार मग देश कसा चालवणार, देशातील सैन्याला पगार कसा देणार, रस्ता कसा बांधणार, महागाई कमी झाली पाहिजे हे मला मान्य आहे. परंतु याला दोन्ही बाजू आहेत. मी संन्यासी असूनही सकाळी ४ वाजता उठतो आणि रात्री १० वाजेपर्यंत काम करतो.

- Advertisement -

देशभरात गेल्या १० दिवसांत सलग नवव्यांदा पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीमध्ये ८०-८० पैशांनी प्रतिलिटर वाढ केली आहे. यानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.८१ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्याच वेळी, डिझेल ९३ रुपयांच्या पुढे जाऊन ९३.०७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.


हेही वाचा : 1 एप्रिलपासून टीव्ही, मोबाईल, एसी, फ्रीजसह महागणार ‘या’ वस्तू; ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -