घरदेश-विदेशप्रेम प्रकरणामुळे औरंगजेब शहीद

प्रेम प्रकरणामुळे औरंगजेब शहीद

Subscribe

भारतीय सेनेचे शहिद सैनिक औरंगजेब यांच्या हत्येमागे एक वेगळा खुलासा झाला आहे. प्रेम प्रकरणामुळे ते अतिरेक्यांच्या जाळ्यात सापडले असल्याचे समोर आले आहे.

भारतीय सेनेचे शहीद झालेले औरंगजेब यांचे अतिरेक्यांनी अपहरण करुण निघृण हत्या केली होती. अतिरेक्यांनी औरंगजेब यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यांच्या हत्येप्रकरणी एक नवा खुलासा समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगजेबने मानक संचालक कार्यपद्धतीचे (स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर्स) उल्लंघन केले होते. त्यामुळेच ते अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकले. नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांना शहीद व्हावे लागले असले, तरी नियमांचे उल्लंघण करण्यामागचे कारण त्यांचे प्रेम प्रकरण असल्याचे समोर आले आहे.

प्रेम प्रकरणाचा सुगावा अतिरेक्यांना लागला

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार औरंगजेब काश्मिरच्या ज्या भागात तैनात होते, त्या भागातील एका स्थानिक महिलेशी त्यांचे प्रेम प्रकरण होते. औरंगजेब ईदच्या निमित्ताने आपल्या घरी जाणार होते. त्यासाठी त्यांनी एक खाजगी गाडीची व्यवस्था केली होती. आपल्या घरी पूंछला जाण्याअगोदर त्यांना आपल्या प्रेयसीला भेटायचे होते. त्यामुळे त्यांनी गाडीच्या ड्रायव्हरला घाट संपण्याअगोदर शोपिया गावाजवळ आपली गाडी थांबवायचा आग्रह केला. त्या जागेवर गाडी थांबताच अतिरेक्यांनी त्यांना गाडीतून ओढून घेतले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

- Advertisement -

प्रेयसीने अतेरिक्यांना दिली माहिती

सेनेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘अतिरेक्यांना औरंगजेब आणि त्या महिलेच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर अतिरेक्यांनी त्या महिलेला औरंगजेब विषयी माहिती सांगण्यासाठी जबरदस्ती केली. शेवटी, महिलेने घाबरुन त्यांना सांगितले की, घाट संपण्याअगोदर औरंगजेब आपल्याला भेटायला येणार आहे’.

माहिती मिळाल्याप्रमाणे अतिरेकी शोपिया गावाजवळील घाटावर औरंगजेबच्या गाडीचे वाट पाहिली. औरंगजेबची गाडी तिथे थांबल्यावर अतिरेक्यांनी त्यांना गाडीतून बाहेर ओढले आणि त्यांची निघृण हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -