…आणि मजुरांची ट्रेन सुटली पण, रोजगार मिळाला

मजुरांची ट्रेन सुटली पण त्यांना रोजगार मिळाला.

ropar workers could not return home due to missing train then took paddy transplanting contract
मजुरांची ट्रेन सुटली पण त्यांना रोजगार मिळाला

कधी कधी जे होत ते चांगल्यासाठीच होत, असे आपण बऱ्याचदा म्हणतो, अशी घटना मजुरांच्या बाबतीत घडली आहे. मजुरांना आपल्या घरी जायचे होते. मात्र, रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच ट्रेन सुटली. यामुळे हतबल झालेले मजूर पुन्हा मागे फिरले. मात्र, हे मागे फिरणे त्यांच्या हित्याचे झाले कारण त्यांना त्यामुळे रोजगार मिळाला.

पंजाबमधील घनौली येथील रुपनगर याठिकाणी रोजगार करण्यासाठी आलेले १३ मजूर आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी आपल्या गावी जाण्यासाठी सर्व तयारी केली होती. विशेष म्हणजे ट्रेनचे बुकिंग देखील केले होते. मात्र, त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि मजुरांना रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यांची त्यातच ट्रेन देखील सुटली. त्यामुळे नाराज झालेले मजूर पुन्हा रुपनगरमध्ये परतले. परंतु, हातातले त्यावेळी काम देखील गेले होते. मात्र, असे असून देखील ते हतबल झाले नाही. या १३ मजुरांनी शेतीची कामे करण्याचे ठरवले. यामध्ये सात जण हे मेस्त्रीचे काम करणारे होते. तर चार जण पीओपीचे आणि दोन जण मजुरांची कामे करणारे होते. परंतु, शेतीबाबत माहिती नसताना देखील त्यांनी लावणीचे काम हाती घेतले आणि त्यांना रोजगार देखील मिळाला.

आणि असा मिळाला रोजगार

सुरुवातीच्या काळात या मजुरांना भाजी मंडईत काम मिळाले. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष शेतीकडे वळवले. सुरुवातीला त्यांना लावणी करण्याचे काम मिळाले. नंतर त्यांनी एक ग्रुप तयार केला. त्यानुसार त्यांनी लावणी करण्याचे काम हाती घेतले. पहिली त्यांना एक एकरमध्ये लावणीचे काम मिळाले. ज्याचे त्यांना ५ ते ६ हजार मिळाले. विशेष म्हणजे त्यांच्या हातातील काम आता संपत नाही. तोपर्यंत त्यांना आता दुसरी ऑफर देखील मिळाली असून एक एकरचे अॅडवान्स बुकिंगचे पैसे देखील मिळाले आहेत.


हेही वाचा – आसाम दुर्घटनेत राष्ट्रीय फुटबॉलपटूसह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू