घरदेश-विदेशRussia-Ukraine War : 3726 भारतीयांना आज युक्रेनमधून मायदेशी परत आणणार; केंद्रीय नागरी...

Russia-Ukraine War : 3726 भारतीयांना आज युक्रेनमधून मायदेशी परत आणणार; केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची माहिती

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा वाटाघाटी होणार आहे. असे असले तरी युक्रेनवर रशियाकडून जोरदार हल्ले सुरु आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने ऑपरेशन गंगा ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत जवळपास 800 भारतीयांना घेऊन हवाई दलाचे C-17 हे विमान हिंडन विमानतळावर दाखल झाले. यानंतर आता याच मोहीमेंतर्गंत आज 3726 विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.

- Advertisement -

तसेच भारत सरकारने (Russia-Ukraine War Indian Nationals Evacuation) रशियासोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. यानुसार खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने 6 तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. खारकीवमधून अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे युक्रेनच्या आसपासच्या देशांच्या सीमेवर नेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

युक्रेनच्या खारकीव शहरात अजूनही हजारो भारतीय विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे. या भारतीय नागरिकांना शहराबाहेर पडू दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना सांगितले की, रशिया सर्व शक्य मदत करण्यास तयार आहे. खारकीवमध्ये युक्रेनचे सैन्य भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत.

- Advertisement -


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदींमध्ये झालेल्या संभाषणात रशियाने मदतीचे आश्वासन दिली आहे. रशियाने सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या युद्धक्षेत्रातून सुरक्षितपणे भारतात पाठवण्यासाठी सर्व आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. रशियन सैन्य या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारतीय विद्यार्थ्यांच्या तात्काळ सुटकेसाठी रशियन लष्कराकडून खारकीव ते रशियापर्यंत सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याबाबतही बोललो आहे. दुसऱ्याच दिवशी रशियाने 6 तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनच्या बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रज्जो येथून 3 फ्लाइटने 3,726 भारतीयांना आज भारतात परत आणले जाईल.


UP Election 2022 Live Update : उत्तर प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 21.79 टक्के मतदान


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -