घरदेश-विदेशविरोधकांच्या दाव्यात तथ्य नाही - शरद पवार

विरोधकांच्या दाव्यात तथ्य नाही – शरद पवार

Subscribe

सोमवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत परमबीर सिंह यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. ज्या दिवसांचा परमबीर सिंह यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

जर तुम्ही माजी पोलीस आयुक्तांचे पत्र पाहिले, तर त्यांनी त्यात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या काळात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकार्‍यांनी परमबीर सिंह यांना दिल्याचे ते म्हणतात. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते, असे शरद पवारांनी सांगितले. ज्या कालावधीसंदर्भात आरोप केले जात आहेत, त्या काळात अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे राजीनाम्याच्या मागण्यांना काहीही आधार उरत नाही, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

इनफ इज इनफ
या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने देशमुख हे क्वारंटाईन होते तर ते १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत होते. तसा व्हिडिओही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आहे, असे पवारांना सांगितले. त्यावर पवार काही क्षण गोंधळल्यासारखे दिसले आणि नंतर चिडून ‘इनफ इज इनफ’ असे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -