घरताज्या घडामोडीShare market : शेअर मार्केटमध्ये पडझडीचं वादळ ; सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची...

Share market : शेअर मार्केटमध्ये पडझडीचं वादळ ; सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची घसरण

Subscribe

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी पडझड होताना पहायला मिळत आहे. गुंतवणूक दारांकडून शेअर्सची चौफेर विक्री सुरू असल्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला. व्यवहार सुरू असताना सेन्सेक्समध्य १ हजार आणि निफ्टीमध्ये ३०० अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये निर्देशांक ५७ हजारांवर आला आहे. तर निफ्टीमध्ये १.५ टक्क्यांची घसरण होऊन १७ हजाराच्या जवळ पोहोचला आहे.

- Advertisement -

मारूती, रिलायन्स, वोडाफोन, एअरटेल, पेटीएम, फेडरल बँकसह इतर शेअर बाजारांवर देखील लक्ष कायम असणार आहे. आज पीएनबी, आरबीएल बँक, लॉरन्स लॅब्स, एलआयसी हाऊसिंन्ग फायनान्ससह अनेक मोठ्या कंपन्यांनी घोषणा केली आहे. तेलासह अनेक खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अदानी विल्मर लिमिटेड या आघाडीच्या कंपनीचा आयपीओ उघडला जाणार आहे. हा आयपीओ ३६०० कोटी रूपये इतका असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार ३१ जानेवारीपर्यंत अधिक गुंतवणूक करू शकतील.

- Advertisement -

दरम्यान, मंगळवारी सुरूवातीला १ हजार अंकांची घसरण दिसून आली. त्यानंतर बाजार सावरला आणि व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स ३६६.६४ अंकांनी वधारला होता. तर निफ्टी ११८.३० अंकांनी वधारला होता. दोन दिवसीय बैठकीत फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे.


हेही वाचा : काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादीत, रशीद खान यांनी घेतलेला निर्णय योग्य – अजित पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -