घरताज्या घडामोडीShare Market : शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्समध्ये ०.३५ टक्क्यांची घसरण

Share Market : शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्समध्ये ०.३५ टक्क्यांची घसरण

Subscribe

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. सुरूवातीला वरती गेलेला सेन्सेक्स बाजार बंद होताना पुन्हा एकदा खाली घसरला आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स १९२ अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्येही ०.५६ टक्क्यांची घसरण होऊन तो ५४,२७८ वर पोहोचला आहे.

मेटल्स क्षेत्रातल्या शेअर्समध्ये देखील तब्बल पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. आज ८४८ कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर २४२८ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. १३२ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाहीये. आज बाजार बंद होताना मेटल, ऊर्जा, ऑईल अँण्ड गॅस, आरोग्य, आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते पाच टक्क्यांपर्यंतची मोठी घसरण झाली आहे.

- Advertisement -

आज शेअर बाजारात Coal India, Tata Steel, ONGC, Hindalco Industries आणि JSW Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून HUL, Eicher Motors, Asian Paints, UltraTech Cement आणि IndusInd Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

सोमवारी देखील जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास सव्वा टक्क्यांची घसरण झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा : आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -