घरताज्या घडामोडीअरुणाचल प्रदेशातील चीनच्या घुसखोरीवरून शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

अरुणाचल प्रदेशातील चीनच्या घुसखोरीवरून शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

Subscribe

गेल्या अनेक वर्षापासून भारत-चीन सीमावाद चर्चेचा विषय आहे. काश्मीरच्या गलवान खोऱ्यातील हिंसक घुसखोरीपासून चीनची अजूनही कुरघोडी सुरुच आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या हद्दीत असलेल्या अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून एक गाव वसवल्याचे समोर आले आहे. एका सॅटेलाईट फोटोद्वारे या गावाचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे सध्या मोदी सरकार विरोधी पक्ष याबाबत जाब विचारत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.

अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?

पाकिस्तानावर केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानवर केलेले एअर स्ट्राइक याचे पुरेपूर भांडवल आणि मार्केटिंग करणारे चिन्यांच्या नवीन घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा आहे. ‘अब आँखो मे आँखे डालकर बात होगी’, असे एका ओळीचे परराष्ट्र धोरण खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जाहीर केले आणि ते गाजलेही खूप. त्याच विधानाला जागून हिंदुस्थानात चिनी गाव उभारणाऱ्या चिन्याविरुद्ध पंतप्रधान नक्की एखादा ‘मास्टरस्ट्रोक’ मारतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही. अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मोदींना केला आहे.

- Advertisement -

चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते?

अरुणाचल प्रदेशात चीनच्या वसलेल्या गावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडे विरोध चीनविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत. शिवसेनेने सर्जिकल स्टाइकची आठवण करून देत चीनला जशाच तसे उत्तर देण्याबद्दल मोदी सरकारला सांगितले आहे. ‘अरुणाचल प्रदेशातून येणारी चीनच्या नव्या घुसखोरीची बातमी धक्कादायक व हिंदुस्थानच्या चिंतेत भर घालणारी आहे. हिंदुस्थानी हद्दीत घुसून अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात चीनने एक अख्खे गाव वसवले आहे. हे सगळे एक रात्रीत घडले नाही. मग आता प्रश्न असा पडतो की, आपल्या हद्दीत चीन नवीन गाव उभारत असताना आपले प्रधान सेवक, चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते? एखाद्याने आपल्या गावात साधे एका घराचे बांधकाम करायचे ठरवले तरी दगडविटा, सिमेंट, स्टील, वाळूचे ढिगारे आणावे लागतात. मालवाहतुकीची वर्दळ सुरू होते आणि कोणाचे बांधकाम सुरू आहे याचा बोभाटा गावभर होतो. इथे तर एकदोन घरे नव्हे, अख्खे गावच उभे राहिले, पण ना हाक ना बोंब! कितीतरी इमारती उभ्या राहिल्या, पक्क्या घरांची बांधकामे झाली. बांधकामाचे साहित्य येऊन पडत होते, पण आपल्या केंद्रीय सरकारला याची कानोकान खबर लागली नाही,’ असे म्हणते सेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा – चीनच्या खोड्या सुरूच, अरुणाचल प्रदेश सीमेजवळ वसवली तीन गावे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -