घरदेश-विदेश'स्कूटर'वर आईला घेऊन तो निघाला 'भारत' भ्रमंतीला

‘स्कूटर’वर आईला घेऊन तो निघाला ‘भारत’ भ्रमंतीला

Subscribe

आतापर्यंत या जोडीने चक्क स्कूटरवरुन २६ हजार किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. आता हे माय-लेक गोव्याच्या दिशेने निघाले आहेत.

कर्नाटकच्या मैसूरमध्ये राहणारा एक ३९ वर्षीय अवलिया आपल्या ७० वर्षाच्या आईला घेऊन चक्क स्कूटरवरुन भारत दर्शनाला निघाला आहे. कृष्णा कुमार असं या इसमाचं नाव असून आपल्या २० वर्षीय जुन्या स्कूटरवर आपल्या आईला घेऊन त्याने हा भन्नाट प्रवास सुरु केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १६ जानेवारीला भारत दर्शनासाठी निघालेल्या या आई-मुलाच्या जोडीने आतापर्यंत २६ हजार किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. या प्रवासात त्यांनी केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्यांची भ्रमंती केली असून, आता ते गोव्याच्या दिशेने निघाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, कृष्णाने ‘मातृ सेवा संकल्प’ या खास संकल्पांतर्गत हा भारत दर्शनाचा घाट घातला आहे. दरम्यान माध्यमांमध्ये तसंच सोशल मीडियामध्ये या अनोख्या उपक्रमाचं आणि तो हाती घेतलेल्या कृष्णा कुमाक यांचं कौतुक केलं जात आहे.

या प्रवासामागील उद्देश काय?

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना कृष्णा कुमार म्हणाले, ‘माझ्या वडिलांचं २०१५ साली निधन झालं. त्यानंतर माझी आई काहीशी एकटी आणि उदास झाली होती. मी एकदा सहज तिला कुठे फिरायला जावसं वाटेल याविषयी विचारणा केली. बेलुर हडेबिलु या छोट्याशा खेड्यात राहिलेली माझी आई तिच्या गावाबाहेर कधीच कुठे गेली नव्हती. बोलता बोलता ती सहज म्हणून गेली की तिला भारत बाघायची इच्छा आहे. त्याचवेळी मी तिला घेऊन भारत भ्रमंती करायचं ठरवलं. आपल्या कुटुंबासाठी कायमच सर्व इच्छा बाजूला ठेवलेल्या माझ्या आईला अख्खा देश फिरवून आणायचा अशी खुणगाठ मी मनाशी बांधली. मात्र, भारत दर्शनाची ही सफर माझ्या २० वर्षीय स्कूटरवरुनच करायची असा माझा हट्ट होता. यामागेही एक विशेष कारण आहे.

- Advertisement -

स्कूटरशी एक खास नाते

मी साधारण २० वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी ही स्कूटर मला भेट दिली होती. त्यांची आठवण म्हणून मी ही स्कूटर आजवर जपून ठेवली आहे. मी या स्कूटरवर जीवापाड प्रेम करतो, सगळीकडे तिला माझ्यासोबत घेऊन जातो. म्हणूनच मला आणि माझ्या आईला प्रिय असलेल्या या स्कूटरलाही भारत दर्शनासाठी आपल्यासोबत न्यायचं असा मी निर्धार केला. सुरुवातीला आईने या गोष्टीला विरोध केला पण कालांतराने ती तयार झाली. त्यामुळेच आम्ही आमच्या लाडक्या आणि २० वर्ष जुन्या स्कूटरवरुन भारत भ्रमंतीला निघालो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -