घरदेश-विदेशकेवळ पृथ्वी नव्हे शुक्र ग्रहावरही ज्वालामुखी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

केवळ पृथ्वी नव्हे शुक्र ग्रहावरही ज्वालामुखी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

 

वॉशिंग्टनः अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या शास्त्रज्ञांनी शुक्र ग्रहावरही ज्वालामुखी असल्याचा दावा केला आहे. शुक्र ग्रहावरील ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे संशोधकांनी म्हटले असून याबाबतची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

- Advertisement -

नासाच्या मॅगेलन अंतराळयानाने शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाची वेगवेगळ्या कक्षेतून छायाचित्रे काढली आहेत. यामध्ये शुक्र ग्रहावर काही ठिकाणी ज्वालामुखींच्या हालचाली दिसत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नवीन संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी शुक्रावर जागृत ज्वालामुखी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या शास्त्रज्ञांनी अंतराळ मोहिमांमध्ये काढलेल्या 30 वर्षे जुन्या फोटोंचा अभ्यास आणि निरीक्षण केले. गेल्या एका वर्षाच्या आत ज्वालामुखीच्या आकारात झपाट्याने बदल झाल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या नव्या शोधामुळे अंतराळातील आणखी एक रहस्य उलगडले गेले असून जगभरातील शुक्र ग्रहाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांना नव्याने उत्साह आला आहे.

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासात शुक्र ग्रहावरील सक्रिय ज्वालामुखीचे पुरावे समोर आले आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, शुक्र ग्रहावरील 2.2 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ज्वालामुखीच्या वेंटच्या आकारात 8 महिन्यांत बदल झाला आहे. यावरून हा ज्वालामुखी सक्रिय असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अनेक दशके जुन्या रडार फोटोंचे निरीक्षण आणि अभ्यासात शुक्रावरील सक्रिय ज्वालामुखीचे नवीन पुरावे मिळाले आहेत. शुक्रावरील ज्वालामुखीच्या वेंटच्या आकारात गेल्या 8 महिन्यांत मोठा बदल झाला आहे.

- Advertisement -

ज्वालामुखीमधून लाव्हा बाहेर पडल्याचे पुरावे
रडार फोटोंच्या अभ्यासानुसार, ज्वालामुखीमधून लाव्हा बाहेर पडण्याची चिन्हे दिसून आली आहेत. फोटोंमध्ये ज्वालामुखीच्या तोंडाचा आकार दुप्पट झाला होता आणि लाव्हाही ज्वालामुखीच्या तोंडाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शुक्रावरील माट मॉन्स या ज्वालामुखीमध्ये हा बदल आढळून आला आहे. माट मॉन्स हा शक्र ग्रहावरील दुसरा सर्वात उंच ज्वालामुखी आहे. शुक्राच्या विषुववृत्ताजवळील या ज्वालामुखीच्या आकारत झालेला बदल म्हणजे हा ज्वालामुखी सक्रिय असल्याची माहिती असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. शुक्र ग्रहावर सापडलेल्या सक्रिय ज्वालामुखींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होऊ शकतो. याचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -