घरदेश-विदेशअनुदानीत गॅस सिलिंडर झाले; साडेसहा रुपयांनी स्वस्त

अनुदानीत गॅस सिलिंडर झाले; साडेसहा रुपयांनी स्वस्त

Subscribe

अनुदानीत गॅस सिलिंडर अवघ्या साडेसहा रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती नोव्हेंबरच्या महिनाअखेरीस समोर आली आहे. या बातमीमुळे गॅस सिलिंडरधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अनुदानीत गॅस सिलिंडर अवघ्या साडेसहा रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती नोव्हेंबरच्या महिनाअखेरीस समोर आली आहे. या बातमीमुळे गॅस सिलिंडरधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनुदानीत गॅस सिलिंडर साडे सहा रुपयांनी तर विना अनुदानीत गॅस सिलिंडर १३३ रुपयांनी स्वस्त झाले असल्याची माहिती पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) ने दिली आहे.

वारंवार होणाऱ्या दरवाढीला ब्रेक

अनुदानीत गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्यानंतर दिल्लीत १४.२ किलोच्या गॅसची किंमत आता ५०७.४२ रुपयांवरून ५००.९० रुपयांवर आली आहे. नवे दर शुक्रवार, ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत होती. मात्र आता दरात कपात झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी सिलिंडरमध्ये १४.१३ रुपयांची दरवाढ झाली होती. तर अनुदानीत गॅस सिलिंडरच्या दरात २ रुपये ९४ पैशांची वाढ झाली होती.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलचेही दर झाले कमी 

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण आणि रुपया मजबूत झाल्याने विनाअनुदानीत गॅस सिलिंडरच्या दरात १३३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ही कपात झाल्याने दिल्लीत विनाअनुदानीत गॅस सिलिंडर (१४.२ किलो) ८०९.५० रुपयांना मिळणार आहे. आधी हा सिलिंडर ९४२.५० रुपयांना मिळत होता. गॅस सिलिंडरमध्ये कपात करण्यात आली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुद्धा गेल्या काही दिवसापासून कपात करण्यात आली आहे. गेल्या सहा आठवड्यात पेट्रोलच्या दरात ९.६ रुपये तर डिझेलच्या दरात ७.५६ रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -