घरदेश-विदेशसुएज कालव्याची कोंडी करणाऱ्या 'एव्हर गिव्हन' जहाजाला ठोठवला कोट्यावधीचा दंड

सुएज कालव्याची कोंडी करणाऱ्या ‘एव्हर गिव्हन’ जहाजाला ठोठवला कोट्यावधीचा दंड

Subscribe

कोर्टाच्या आदेशानंतर जहाज ताब्यात घेण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे.

सुएज कालव्याची कोंडी करणाऱ्या ‘एव्हर गिव्हन’ जहाजामुळे इजिप्तच्या सुएझ कालव्यातील जलवाहतूक सहा दिवस ठप्प होती. जगभरातील अनेक व्यापाऱ्यांना कोट्यावधीचा आर्थिक फटाक बसला. त्यामुळे आता या जहाजावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या जहाजावर जप्तीची कारवाई होणार असून तब्बल ९०० दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास ६५४० कोटी रुपयांचा दंड ठोठवला जाणार आहे. बर्नहार्ड श्यूल्ट शिप मॅनेजमेंटच्या(बीएसएम) प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानंतर जहाज ताब्यात घेण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे.

क्त्या ‘एमव्ही एव्हर गिव्हन’ जहाजाची टेक्निकल मॅनेजर आहे. दरम्यान सुएझ कालवा प्राधिकरणाकडून झालेल्या जहाज जप्तीच्या कारवाईवर बीएसएमचे सीईओ इयान बेवरीज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना बेवरीज म्हणाले की, सुएझ कालवा प्राधिकरणाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. आम्ही सर्व चौकशीला सुरुवातीपासून सहकार्य करत असून पाहिजे ती माहिती देत आहेत. त्यामुळे या प्रकरणावर लवकर निकाल अपेक्षित आहे. जेणेकरुन जहाज आणि कर्मचारी सुएझ कालव्याच्या सीमेतून बाहेर पडतील.

- Advertisement -

सध्या एमव्ही एव्हर गिव्हन जहाज इजिप्तच्या ग्रेट बिटर लेकमध्ये आहे. सुएझ कालवा प्राधिकरण आणि जहाज कंपनीमध्ये तोडगा निघत नाही तोपर्यंत हे जहाज येथेच असणाप आहे. या जहाजामधील सर्व कर्मचारी सुखरुप असून बीएसएम सतत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. या जहाजाच्या क्रूमध्ये २५ भारतीय आहेत.

वादळामुळे भरकटल्याने महाकाय ‘एव्हरगिव्हन’ जहाज सुएझ कालव्यात अडकले होते. त्यामुळे दोन्ही दिशेची जलवाहतूक ठप्प झाली होती. सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या जहाजाची सुटका करण्यात आली. जागतिक व्यापारापैकी १२ टक्के व्यापार वाहतुक सुएझ कालव्यातून होते. दरम्यान कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्याने जगभरातील अनेक देशांनी महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली होती.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -