घरCORONA UPDATEया वर्षातील सर्वात मोठा चंद्र, घडणार 'सुपरमून'चे दर्शन!

या वर्षातील सर्वात मोठा चंद्र, घडणार ‘सुपरमून’चे दर्शन!

Subscribe

अवकाशात आज सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. याला सुपरमून असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे आज या चंद्राचा रंगदेखील बदलेला दिसणार आहे.

अवकाशात आज सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. याला सुपरमून असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे आज या चंद्राचा रंगदेखील बदलेला दिसणार आहे. बुधवार, ८ एप्रिलच्या मध्यरात्री हा सुपरमून दिसणार आहे. चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ येणार असल्याने आजच चंद्र सर्वात मोठा दिसणार आहे. हा चंद्र काहीसा गुलाबी पाहायला मिळणार आहे.

केव्हा होतो चंद्र, सुपरमून

चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी होते. तसेच चंद्राची चमक वाढते तेव्हा सुपरमूनचे दर्शन घडते. या काळात चंद्र नेहमीपेक्षा १४ टक्क्यांनी मोठा आणि ३० टक्क्यांनी अधिक चमकदार दिसतो. याला गुलाबी किंवा पिंक सुपरमून असेही म्हटले जाते. अमेरिका आणि कॅनडामध्ये या ऋतूमध्ये फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो. या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून हे नाव देण्यात आले आहे. हे फुल गुलाबी रंगाचे असल्यामुळे याला मॉस पिंक असेदेखील म्हटले जाते.

- Advertisement -

यावेळी दिसणार भारतात सुपरमून

आशियासह इतरांसाठीही आज ८ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजून ३५ मिनिटांनी हा सुपरमून दिसणार आहे. मात्र त्यावेळी भारतामध्ये सकाळचे ८ वाजलेले असणार आहे. सकाळच्या उजेडात भारतीयांना हा चंद्र पाहता येणार नाही. याआधी अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, साधारण ४१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७९ साली पहिला सुपरमून दिसला होता. यंदा मे महिन्यातही सुपरमून दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

वुहान शहर ७६ दिवसांनंतर लॉकडाऊनमधून मुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -