Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय; 3 हायकोर्टात 20 न्यायाधीशांच्या नियुक्तीला दिली मंजुरी

सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय; 3 हायकोर्टात 20 न्यायाधीशांच्या नियुक्तीला दिली मंजुरी

Subscribe

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने देशातील तीन हायकोर्टामध्ये 20 न्यायाधीशांच्या नियुक्तीला हिरवा झेंडा दाखवला आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्त्वाखाली सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट, कर्नाटक हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्ट अशी तीन हायकोर्टात 20 न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने सोमवारी झालेल्या बैठकीत पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टातील न्यायाधीशांच्या पदावर 9 न्यायिक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या निवेदनानुसार, कॉलेजियमने मुंबई हाय कोर्टाचे न्यायाधीश म्हणून दोन वकिलांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे 7 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कॉलेजियमने 6 न्यायिक अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यास मान्यता दिली होती. याशिवाय कर्नाटक हायकोर्टाचे स्थायी न्यायाधीश म्हणून तीन अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता.

पंजाब हरियाणा हायकोर्टातील न्यायाधीशांची लिस्ट

गुरबीर सिंग, दीपक गुप्ता, अमरजोत भाटी, रितू टागोर, मनीषा बत्रा, हरप्रीत कौर जीवन, सुखविंदर कौर, संजीव बेरी आणि विक्रम अग्रवाल

मुंबई हायकोर्टासाठी मंजूर केलेल्या न्यायाधिशांची लिस्ट

- Advertisement -

संजय आनंदराव देशमुख, यंशिवराज गोपीचंद खोबरागडे, महेंद्र वधूमल चांदवानी, अभय सोपानराव वाघवासे, रवींद्र मधुसूदन जोशी, वृषाली, शुभांगी विजय जोशी, संतोष गोविंदराव चपलगांवकर, मिलिंद मनोहर सथाये.

कर्नाटक हायकोर्टातील न्यायाधीशांची लिस्ट

न्यायाधीश मोहम्मद घौस शुक्रे कमल, न्यायाधीश राजेंद्र बदामीकर आणि न्यायाधीश खाजी जयाबुन्निसा मोहिउद्दीन.


तेलंगणामध्ये ई-बाईक शोरुमला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -