सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार? संपूर्ण राज्याचं लक्ष

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Shivsena) कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी हे बाजू मांडत आहेत. दोन्ही गटाला आपली बाजू मांडण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने काल वेळ दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज काय निर्देश देतात, याकडे आज साऱ्यांचे लक्ष आहे.

सत्तासंघर्षावरून सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज पुन्हा याप्रकरणी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Shivsena) कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी हे बाजू मांडत आहेत. दोन्ही गटाला आपली बाजू मांडण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने काल वेळ दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज काय निर्देश देतात, याकडे आज साऱ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार उद्या, सर्वोच्च न्यायालयात आज काय झालं? वाचा एका क्लिकवर

बुधवारी झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी शिवसेना गटाची आणि हरिश साळवे यांनी शिंदे गटाची बाजू लढली. शिंदे गटाने एकतर दुसऱ्या पक्षात विलिन व्हावं किंवा त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करावा असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. तर, शिंदे गटातील सदस्यांनी शिवसेना अद्यापही सोडलीच नसल्याचं हरिश साळवे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदे गट नक्की बंडखोर नाहीत मग नेमके कोण? असा प्रश्न सरन्यायाधिशांनी विचारल्यावर आम्ही नाराज गट असल्याचं हरिश साळवे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – सुप्रीम कोर्ट सुनावणी: आम्ही पक्षातील नाराज सदस्य, हरिश साळवेंचा शिंदे गटाकडून युक्तीवाद

दरम्यान, मूळ राजकीय पक्षाची व्याखाच ठाकरे गटाच्या कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवली तर, शिंदे गटाने सादर केलले्या लेखी युक्तीवादातील कायदेशीर मुद्दे सरन्यायाधिशांना समजले नसल्याने त्यांनी पुन्हा हे मुद्दा आज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. आता संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागले आहे.

हेही वाचा – सुप्रीम कोर्ट सुनावणी: दोन तृतीयांश लोक पक्षावर दावा करू शकत नाहीत, सिब्बलांनी व्याख्याच वाचून दाखवली