घरदेश-विदेशदिल्ली हिंसाचार प्रकरणी आपच्या निलंबित नगरसेवकाची धक्कादायक कबुली

दिल्ली हिंसाचार प्रकरणी आपच्या निलंबित नगरसेवकाची धक्कादायक कबुली

Subscribe

दिल्लीतील हिंसाचारामागे आपलाच हात असल्याची धक्कादायक कबुली आम आदमी पक्षाच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली आहे. ताहिर हुसैन यांने सांगितले की, जेव्हा २०१७ मध्ये मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हापासूनच पैसे आणि राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्याचा विचार माझ्या मनात सुरु होता. या कामासाठी हुसैनला खालिद सैफी आणि पीएफआय म्हणजेच पॉप्युर फ्रण्ट ऑफ इंडिया या कडवट मुस्लीम संघटनेने मदत केल्याचे हुसैनने कबुली जबाब देताना म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काय म्हणाला ताहिर हुसैन 

माझ्या ओळखीतल्या खालिद सैफीने मला तुझ्याकडे राजकीय ताकद आणि पैसा दोन्ही आहे. याचा वापर आपण हिंदूंविरोधात आणि आपल्या समजासाठी करुयात. मी यासाठी कधीही तुझी मदत करायला तयार असेल. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर सैफी माझ्याकडे आला. आता आम्ही गप्प बसणार नाही. त्याचवेळी राम मंदिर खटल्याचा निकाल आणि सीएए (सुधारित नागरिकत्व कायदा) ही आला. तेव्हा मला पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे, असे वाटू लागले. काहीतरी केले पाहिजे अशी भावना माझ्याही मनात निर्माण झाली. ८ जानेवारी रोजी खालिद सैफीने माझी भेट जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा (जेएनयू) माझी विद्यार्थी असलेल्या उमर खालिदशी करुन दिली. शाहीन बाग येथील पीएफआयच्या कार्यालयामध्ये ही भेट झाली. तिथे खालिदने आपण मारण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. तर खालिद सैफीने पीएफआयचा सदस्य असणारा दानिश हिंदूंविरोधातील लढाईमध्ये आपल्याला आर्थिक मदत करणार आहे. पीएफायच्या कार्यालयामध्येच आम्ही यासंदर्भातील योजना कयार केली. सरकारला फटका बसेल असं काहीतरी दिल्लीमध्ये करण्याचा आमचा विचार होता. या घटनेनंतर सरकार सीएए कायदा रद्द करेल असं आम्हाला वाटलं होतं. लोकांना चिथवून त्यांना रस्त्यावर उतरवण्याचं काम खालिद सैफीकडे देण्यात आल्याचंही हुसैनने जबाबामध्ये सांगितलं.

- Advertisement -

सध्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी हुसैनबरोबरच १० आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. खालिद सैफीलाही अटक करण्यात आली आहे. तर उमर खालिदची शनिवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. तसेच दंगलीसंदर्भातील चौकशीनंतर तपासासाठी त्याचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा –

ड्रॅगनला यु्द्धाची खुमखुमी; लडाखच्या दिशेने तैनात केली बॉम्बर विमाने!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -